

Mumbai First Automated Metro
ESakal
मुंबई : 'एमएमआरडीए'कडून गायमुख-वडाळा भक्ती पार्कदरम्यान तब्बल ३५ किलोमीटर लांबीची मेट्रो मार्गिका उभारली जात असून, या मार्गिकसाठी एमएमआरडीए एल अँड टी या कंपनीकडून मेट्रो ट्रेन घेत आहे. त्यानुसार श्रीसिटी (आंध्र प्रदेश) 'अलस्टोम' या कंपनीच्या आंध्र प्रदेशामधील प्रकल्पात सहा डब्यांची अत्याधुनिक स्वयंचलित मेट्रो ट्रेन तयार झाली आहे. ती दिवाळीनंतर मुंबईसाठी रवाना केली जाणार असून, डिसेंबरमध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे मेट्रो मार्गिका टप्प्याटप्प्याने सुरू करण्याच्या 'एमएमआरडीए'च्या प्रयत्नाला वेग येणार आहे.