ब्रेकिंग : जेजे रुग्णालयात कोरोनाचा पहिला मृत्यू

ब्रेकिंग : जेजे रुग्णालयात कोरोनाचा पहिला मृत्यू

मुंबई : कोरोनाचा शिरकाव जे जे सरकारी रुग्णालयातही झाला असुन दोन निवासी डॉक्टरांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. जे जे तील 42 नंबर वॉर्डमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शिवाय त्यांचे स्वाब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. हे दोघेही मेडीसीन विभागात काम करत होते. काही दिवसांपूर्वी स्ट्रोक आलेली एक व्यक्ती जे जे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाली होती. 3 दिवसांपूर्वीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर, या व्यक्तीचा स्वाब घेण्यात आला होता.

तीन दिवसांनी मिळालेल्या स्वाब तपासणीच्या अहवालनंतर ही व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समजले. हे दोन्ही डॉक्टर या व्यक्तीच्या संपर्कात आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून या दोन्ही डॉक्टरांना आयसोलेट केलं असल्याची माहिती जेजे रूग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

जे जे मध्ये कोरोनासाठी एक विशेष वॉर्ड तयार करण्यात आला आहे. जिथे कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. पण सध्या जे जे त एक ही रुग्ण नसल्याने या वॉर्ड मध्ये या दोन्ही डॉक्टरांवर उपचार केले जात आहेत.

लोकांचा हलगर्जीपणा कायम -

कोरोनाच्या रुग्णांनी संबंधित रुग्णालयांमध्ये जाऊनच उपचार घ्यायचे आहेत असं वारंवार सांगूनही लोक हलगर्जीपणा करत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे, डॉक्टरांचा जीव धोक्यात येत आहे. अनेकदा कोरोनाची लक्षणे समजत नसल्याने रुग्ण कोणत्याही रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार घेत आहेत. त्यामूळे डॉक्टरांना कोरोना होण्याचे प्रमाण वाढत आहे.

सेंट जॉर्ज रुग्णालयात 8 ते 10 कोरोना रुग्ण -

कोरोना साठी सध्या सेंट जॉर्ज हे विशेषतः काम करत आहे. या रुग्णालयात सध्या 8 ते 10 रुग्ण दाखल असुन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

first covid 19 death case registered in mumbais j j hospital read full story

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com