

Heartwarming Moment in Kushinagar Express; Woman Gives Birth Safely During Journey
esakal
-नितीन बिनेकर
मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनसहून भुसावलकडे जाणाऱ्या कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये रविवारी एक हृदयस्पर्शी घटना घडली. प्रचंड गर्दीच्या जनरल डब्यात प्रवास करणाऱ्या गर्भवती महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. परिस्थिती गंभीर होत असतानाच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आणि एका नर्सच्या मदतीमुळे धावत्या ट्रेनमध्येच महिलेची सुखरूप प्रसूती झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला.