esakal | पहिल्याच दिवशी डोंबिवलीकरांचा कामावर 'लेट मार्क'! अपुऱ्या बससेवेमुळे गोंधळ
sakal

बोलून बातमी शोधा

पहिल्याच दिवशी डोंबिवलीकरांचा कामावर 'लेट मार्क'! अपुऱ्या बससेवेमुळे गोंधळ

आजपासून काही प्रमाणात लॉकडाऊन अनलॉक करण्यात आला आहे. त्यात सर्व कार्यालयं आणि मंदिरासह बाजारपेठा उघडण्यास आजपासून मुभा देण्यात आली आहे. याचदरम्यान सकाळी सकाळी डोंबिवलीत कामाल जाणाऱ्या नोकदारांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. 

पहिल्याच दिवशी डोंबिवलीकरांचा कामावर 'लेट मार्क'! अपुऱ्या बससेवेमुळे गोंधळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


मुंबई- कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाला. गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन होतं. सध्या लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु आहे. या टप्प्यात आजपासून काही प्रमाणात लॉकडाऊन अनलॉक करण्यात आला आहे. त्यात सर्व कार्यालयं आणि मंदिरासह बाजारपेठा उघडण्यास आजपासून मुभा देण्यात आली आहे. याचदरम्यान सकाळी सकाळी डोंबिवलीत कामाल जाणाऱ्या नोकदारांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. 

सकारात्मक बातमी! कोरोना रुग्णांसाठी स्टीम थेरपी ठरतेय गुणकारी! वाचा बातमी सविस्तर

आजपासून अनेक सरकारी आणि खासगी कार्यालयात सुरू झालेत. त्यात लोकल बंद असल्यानं आणि अपुऱ्या बससेवेमुळे डोंबिवलीत अनेक नोकरदाऱ्याचं प्रचंड हाल झाले. डोंबिवलीतील रेल्वे स्थानक परिसरात चाकरमान्यांची प्रचंड गर्दी झाली होती. बस पकडण्यासाठी लांबच्या लांब रांगाही लागल्या होत्या. एवढी मोठी राग थेट फडके रोड परिसरात पोहोचली होती. 

अनलॉकच्या पहिल्या दिवशी अपुऱ्या बस सेवेमुळे सरकारच्या उपाययोजनांचा फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. दरम्यान दुसरीकडे मुंब्रा, दिवा भागातही बराच नोकरदार वर्ग कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले. बस पकडण्यासाठी या भागातही मोठी गर्दी झालेली दिसली. येथेही बससाठी लोकांनी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. 

मुंबईत नालेसफाई फक्त 40 टक्केच; भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला ठाकरे सरकारवर आरोप.. 

2600 बेस्ट बस आज रस्त्यावर 

पहिल्या दिवसापासूनच सुमारे 2,600 बस चालविण्याचे नियोजन करण्यात आलं आहे. मात्र तरीही रेल्वे सेवा बंद असल्यानं बेस्ट सेवेवर ताण पडल्याचं चित्र आहे. बस सेवा जरी सुरु झाली असली तरी प्रवाशांची मात्र गैरसोय झाली आहे.  प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन बेस्टने पनवेल, कल्याण, विरार, नालासोपारा, बदलापूरमधूनही मुंबईत येण्यासाठी बसमार्ग खुले केले आहेत. एका आसनावर एक प्रवासी, पाच जणांना उभ्याने प्रवासाची सवलत अशा अटींमुळे बसमधील प्रवासी संख्या 30 पर्यंत मर्यादित आहे.

अशा मार्गावर धावणार बस सेवा 

बदलापूर व्हाया ऐरोली-शिळफाटा ते राणी लक्ष्मी चौक (15 बस)

कल्याण व्हाया मुंब्रा-खारेगाव ते राणी लक्ष्मी चौक (15 बस)

पनवेल ते राणी लक्ष्मी चौक (10 बस)

सायंकाळच्या वेळेस परतीच्या मार्गावर 5.15 वाजल्यापासून बस सुटतील.

सायंकाळी कामावर जाणाऱ्यांना दुपारी 3.45 मिनिटांनी बस सुटतील.

loading image
go to top