मुंबईत नालेसफाई फक्त 40 टक्केच; भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला ठाकरे सरकारवर आरोप.. 

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 8 June 2020

मुंबईतील नालेसफाई 40 टक्केच झाली आहे.त्यामुळेच मुंबई पालिकेने डंपिंग ग्राऊंडवर टाकलेल्या गाळाची आकडेवारी जाहीर करत नाही. असा आरोप माजी शिक्षण मंत्री,भाजप आमदार अॅड.आशिष शेलार यांनी केला. 

मुंबई: मुंबईतील नालेसफाई 40 टक्केच झाली आहे.त्यामुळेच मुंबई पालिकेने डंपिंग ग्राऊंडवर टाकलेल्या गाळाची आकडेवारी जाहीर करत नाही. असा आरोप माजी शिक्षण मंत्री,भाजप आमदार अॅड.आशिष शेलार यांनी केला. 

मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा,शेलार आणि नगरसेवकांनी आज मुंबईतील नालेसफाईची पाहाणी केली.यावेळी पालिकेतील गटनेते  प्रभाकर शिंदे, पक्षनेते विनोद मिश्रा, प्रभारी भालचंद्र शिरसाट ही उपस्थीत होते. 

हेही वाचा: राज्यातील धार्मिक स्थळे तूर्तास बंदच; राज्य सरकारची अद्याप परवानगी नाही... 

जूहू येथील, गझदरबांध नाला, एस एन डी टी नाला, सांताक्रूझ गझदरबांध पंपिंग स्टेशन, गोरेगावची वाळभाट नदी, भांडूपचा शाम नगर नाला, घाटकोपरचा सोमय्या नाला, चेंबूरचा पिडब्लुडी एम एम आरडी ए नाला आदी नाल्यांची पाहणी करण्यात आली. 

यावर्षी 40 टक्केच काम पुर्ण झाल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी गाळ नाल्यातच आहे. काही ठिकाणी नाल्याच्या बाजूला गाळ पडून आहे. गाळ अजून उचलेला नाही. त्यामुळे महापालिकेने गेल्यावर्षी आणि यावर्षीचे नाल्याच्या गाळाच्या वजनाची आकडेवारी घोषित करावी. कंत्राटदाराला जास्त मनुष्य बळ उपलब्ध करायला अडचणी आल्या का ते सांगा, यावर्षी डंपिंग वर किती गाळ टाकला ते घोषित करा, लपवाछपवी करुन मुंबईकरांचा जीव धोक्यात घालू नका, असे  आशिष शेलार यांनी म्हणाले.

हेही वाचा: सोनू सूद तातडीनं उद्धव ठाकरेंची भेट घेणार; काय आहे कारण..जाणून घ्या 

ऑनलाईन सभा घ्यावी:

 नालेसफाईची 40 टक्केपेक्षा जास्त कामे झालेली नाहीत. पण महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक होत नाही. सर्वसाधारण सभा घेतली जात नाही. आँनलाईन सभा घ्यावी असे सत्ताधाऱ्यांना वाटत नाही. त्यामुळे लोकशाहीने आम्हाला जे अधिकार दिले आहेत त्यानुसार मुंबईकरांच्या अडचणी मांडायच्या कुठे असा प्रश्न आहे.असे मंगलप्रभात लोढा यांनी नमुद केले.

only 40 percent  drain cleaning has done by state government said bjp


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: only 40 percent drain cleaning has done by state government said bjp