6 वर्षांच्या थॅलेसिमियाग्रस्त भावाला जीवदान, भारतातील पाहिलं 'सेव्हिअर सिबलिंग' यशस्वी

मिलिंद तांबे
Thursday, 15 October 2020

सहदेव सिंग सोळंकी आणि अल्पा सोळंकी यांचा दुसरा मुलगा अभिजीत याला थॅलेसेमिया मेजर असल्याचे निदान झाले.

मुंबई : थॅलेसिमिया मेजर या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या भावाच्या बोन मॅरो ट्रान्सप्लान्टसाठी त्याच्याशी जुळणारे एचएलए असणारी बेबी काव्या आयव्हीएफच्या माध्यमातून जन्माला आली. असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह थेरपी (एआरटी) मधील पीजीटी-एम (प्री-इम्‍प्‍लाण्‍टेशन जेनेटिक टेस्टिंग फॉर मोनोजेनिक डिसऑर्डर) सह एचएलए (ह्युमन ल्यूकोसाइट अँटिजेन) मॅचिंग नामक एका नव्या पद्धतीच्या माध्यमातून आपल्या मोठ्या भावाचे प्राण वाचविण्यासाठी बेबी काव्याचा जन्म झाला आणि तिनेच आपल्या भावाचे प्राण वाचवले. 

सहदेव सिंग सोळंकी आणि अल्पा सोळंकी यांचा दुसरा मुलगा अभिजीत याला थॅलेसेमिया मेजर असल्याचे निदान झाले. दर महिन्याला शरीरातील रक्त बदलण्याच्या प्रक्रियेवर तो अवलंबून होता. मुलावरील उपचाराचा अखेरचा पर्याय म्हणून बोन मॅरो प्रत्यारोपण करण्याचा सल्ला सोळंकी दाम्पत्याला देण्यात आला. मात्र मुलाशी जुळणारे ह्युमन ल्यूकोएऩअसाइट अँटिजेन (एचएलए) असणारा दाता मिळत नसल्याने हे कुटुंब पूर्णपणे निराश झाले होते. सखोल अभ्यास केल्यानंतर त्यांना त्यातून  'सेव्हिअर सिबलिंग' या उपचारपद्धतीची माहिती मिळाली. हा पर्याय म्हणजे त्यांच्यासाठी आशेचा किरण होता.

नोव्हा आयव्हीएफमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी अहमदाबाद केंद्रामध्ये डॉ. बँकर यांच्या नेतृत्वाखाली ही पहिलीवहिली ट्रीटमेंट पार पाडली. यात मातेच्या 18 भ्रूणांची बायॉप्सी करण्यात आली, ज्यापैकी एकच भ्रूण अनुरूप एचएलए असणारे, प्रीइम्‍प्‍लाण्‍टेशन जेनेटिक टेस्टिंग फॉर मोनोजेनिक डिसीजेज (पीजीटी एम) चे निकष पूर्ण करणारे होते. त्यामुळे पहिल्याच सायकलमध्ये ते यशस्वीरित्या गर्भाशयात ठेवण्यात आले. गर्भधारणा यशस्वी होऊन त्यातून आपल्या भावंडाशी 10/10 एचएलए म्हणजे संपूर्णपणे अनुरूप एचएलए असणा-या सुदृढ कन्येचा जन्म झाला. अशाप्रकारे मार्च 2020 संपूर्णत: अनुरूप एचएलए दाता मिळाल्याने नोव्हा आयव्हीएफमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी अहमदाबाद केंद्रामध्ये डॉ. बँकर यांच्या नेतृत्वाखाली ही पहिलीवहिली ट्रीटमेंट पार पाडली. 

महत्त्वाची बातमी : "ती कोण आहे? आमदार, खासदार, नगरसेविका आहे का?" अमृता फडणवीसांना ठाकरी भाषेत तिखट उत्तर

यात मातेच्या 18 भ्रूणांची बायॉप्सी करण्यात आली, ज्यापैकी एकच भ्रूण अनुरूप एचएलए असणारे, प्रीइम्‍प्‍लाण्‍टेशन जेनेटिक टेस्टिंग फॉर मोनोजेनिक डिसीजेज (पीजीटी एम) चे निकष पूर्ण करणारे होते. त्यामुळे पहिल्याच सायकलमध्ये ते यशस्वीरित्या गर्भाशयात ठेवण्यात आले. गर्भधारणा यशस्वी होऊन त्यातून आपल्या भावंडाशी 10/10 एचएलए म्हणजे संपूर्णपणे अनुरूप एचएलए असणा-या सुदृढ कन्येचा जन्म झाला. अशाप्रकारे मार्च 2020 संपूर्णत: अनुरूप एचएलए दाता मिळाल्याने, आजारग्रस्त मुलावर सीआयएमएस हॉस्पिटलमध्ये बोन मॅरो प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली. आज हा मुलगा निरोगी असून सर्व धोक्यांपासून सुरक्षित असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

भारताच्या प्रजननशास्त्राच्या इतिहासाचा एक भाग बनण्याचा हा अनुभव अत्यंत भारावून टाकणारा आहे, असे नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीचे मेडिकल डायरेक्टर डॉ. मनीष बँकर सांगतात. अभिजीतच्या बाबतीत ह्युमन ल्युकोसाइट अँटिजेन (एचएलए) जुळणारा दाता मिळत नसल्याने आम्ही प्री-जेनेटिक डायग्नोसिस आणि स्क्रीनिंग टेस्ट (पीजीडी व पीजीएस)च्या माध्यमातून एचएलए जुळत असलेले आयव्हीएफ करण्याचा पर्याय वापरायचे ठरवले. थॅलेसेमिया मेजरच्या रुग्णांसाठी एचएलए जुळणा-या दात्याकडून मिळालेल्या बोन मॅरोचे प्रत्यारोपण हा उपचारांचा सर्वोत्तम पर्याय मानला जातो.

आम्ही देशभरातील अनेक डॉक्टर्सचा सल्ला घेतला होता, पण यशस्वी प्रत्यारोपणाची हमी कुणीही दिली नाही तेव्हा आमच्या लहान मुलाला वाचविण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याचा निर्धार मी केला. माझे वैद्यकीय ज्ञान सीमित होते, पण माझ्या मुलाला या प्राणघातक आजारातून बाहेर काढण्याचा एखादा मार्ग सुचवू शकेल असा पर्याय शोधण्यासाठी मी या विषयाचे संशोधन केले असे मुलाचे वडील सहदेव सोळंकी म्हणाले.

महत्त्वाची बातमी : मुंबईतील मेट्रो सुरु करण्यास परवानगी, ग्रंथालयं देखील उद्यापासून खुली होणार; शाळांबाबत काय म्हटलंय परिपत्रकात, वाचा

ही पद्धत अतिशय कष्टाची आणि प्रचंड खर्चिक आहे व यात बहुशाखीय तज्ज्ञांचा समन्वय आवश्यक आहे. भ्रूणामध्ये समस्या असल्यामुळे वारंवार गर्भधारणा करावी लागणे, प्री-नॅटल चाचण्या आणि गर्भपात टाळण्याची इच्छा असलेल्या काही निवडक कुटुंबांसाठी हा पर्याय व्यवहार्य ठरू शकतो. असे सीआयएमएस हॉस्पिटलच्या, संकल्प सीआयएमएस बीएमटी युनिटच्या प्रोग्राम डायरेक्टर डॉ. दीपा त्रिवेदी यांनी सांगितले.

first ever savior sibling treatment successful six years old brother got new life


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first ever savior sibling treatment successful six years old brother got new life