लॉकडाऊनच्या काळात मुंबईच्या महिलेकडून राज्यातलं पहिलं हृदय दान

लॉकडाऊनच्या काळात मुंबईच्या महिलेकडून राज्यातलं पहिलं हृदय दान

मुंबईः कोरोना व्हायरसनं सध्या सर्वत्र विळखा घातला आहे. सर्वजण या संकटाचा सामना करताहेत. कोरोनाच्या काळात हाताच्या बोटावर मोजण्या इतकीही अवयवदान झाली नाहीत. त्यातच नुकतेच एका ३९ वर्षीय महिलेनं हृदय , यकृत आणि दोन मूत्रपिंडे दान केलीत. मात्र, यात अख्ख्या महाराष्ट्रातील कोरोना काळात पहिले हृदय दान झाले असून कोरोना काळातील हे चौथे अवयवदान असल्याचे विभागीय अवयवदान आणि प्रत्यारोपण समिती कडून सांगण्यात आलंय. या वर्षातील हे 23 वे अवयवदान  असून या महिलेच्या अवयव दानामुळे चार जणांना जीवदान मिळणार आहे. 

12 जुलै या दिवशी एका बेशुद्ध अवस्थेत 39 वर्षांच्या महिलेला नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. सीटी स्कॅनमध्ये त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला असल्याचे निदान करण्यात आले. रुग्णावर त्वरित न्यूरो सर्जनने शस्त्रक्रिया केली गेली. मात्र, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही तिच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर 17 जुलै शुक्रवारी रुग्णाला मेंदू मृत घोषित करण्यात आले.

उपचार करणार्‍या डॉक्टर आणि प्रत्यारोपणाच्या समन्वयकांनी तिच्या कुटुंबियांना अवयवदानाबद्दल सुचवले. रुग्णाचे कुटुंबीय ही अवयवदानासाठी तात्काळ तयार झाले. यावेळी, यकृत, हृदय आणि दोन मूत्रपिंडांचे दान करण्यात आले. विभागीय अवयवदान आणि प्रत्यारोपण समितीच्या मार्गदर्शक तत्त्वे आणि निकषांनुसार दान आणि प्रत्यारोपण करण्यात आले. लॉकडाऊननंतर राज्यातील हे पहिले हृदय दान ठरले असल्याचे सांगण्यात आले.

अवयवदान करून 4 जणांचे जीव वाचवण्यास तयार झालेल्या कुटुंबियांचे आम्ही आभार मानतो. कोरोना काळात संपूर्ण जग गोंधळात पडत आहे. अतिशय निराशाजनक परिस्थिती असताना ही या कुटुंबियांचा अवयदानाचा निर्णय मनोबल वाढवण्यात मदत केल्याचे अपोलो रुग्णालयांचे संचालक वैद्यकीय सेवा डॉ. प्रसाद मुगळीकर यांनी सांगितलंय. 

तर, हे घडवून आणण्यासाठी सर्व डॉक्टर आणि प्रत्यारोपणाच्या टीमचे आणि दात्याच्या कुटुंबियांचे अवयवदान चळवळीतील कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असल्याचे मुंबई विभागीय अवयवदान आणि प्रत्यारोपण समितीच्या डॉ. एस.के. माथूर आणि डॉ. भरत शहा यांनी सांगितले. महामारीचं संकट सुरु असतानाही कोणत्याही अवयवदान प्राप्तकर्त्यास कोविड संसर्ग झाला नसल्याचे सांगण्यात आले.

संपादनः पूजा विचारे

First heart donation in state from a woman Mumbai during lockdown

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com