
Tukaram Omble: 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मुंबई पोलीस दलातील उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मूळ गावी स्मारक उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतला आहे. यासाठी पहिल्या टप्प्यातील निधी सातारा जिल्हा प्रशासनाला वितरीत करण्यात आला आहे. याबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील केदंबे इथं तुकाराम ओंबळे यांचं स्मारक उभारलं जाणार आहे.