देवेंद्र फडणवीस यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला, पुढील सात दिवस घरी क्वारंटाईन राहणार

देवेंद्र फडणवीस यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला, पुढील सात दिवस घरी क्वारंटाईन राहणार

मुंबई : महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी २४ तारखेला आलेली. दरम्यान आज देवेंद्र फडणवीस यांना मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दहा दिवसानंतर फडणवीसांची पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात आलेली. मात्र दहाव्या दिवशीही फडणवीसांची चाचणी पॉझिटिव्ह आलेली. दरम्यान, आज डिस्चार्ज घेतल्यानंतर पुढील सात ते दहा दिवस फडणवीस आता स्वतःच्या घरामध्ये क्वारंटाईन राहणार आहेत. भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांनी फडणवीसांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. फडणवीसांची प्रकृती चांगली असल्याचं आणि ते घरी सोडण्याच्या प्रत्येक पॅरामीटरमध्ये बसत असल्याचे गिरीश महाजन म्हणालेत.  

महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली त्याआधी काही दिवस फडणवीस हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत होते. ते सतत गर्दी आणि लोकांमध्ये फिरत होते. त्यावेळी फडणवीसांनी तब्बल ९०० किलोमीटरपेक्षा अधिकचा प्रवास केला होता आणि अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांचा बिहार दौरा देखील नियोजित होता.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी, असं म्हणत त्यांनी आपल्या झालेल्या कोरोनाबद्दल माहिती दिली होती. 

maharashtra opposition leader devendra fadanavis discharged from st George hospital

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com