मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी, नक्की वाचा

पूजा विचारे
Friday, 28 August 2020

आता लोकल सेवा नियमितपणे सुरु होण्याची प्रतिक्षा करत असलेल्या लाखो प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी मध्य रेल्वेनं दिली आहे.

मुंबईः लोकल ट्रेनला मुंबईची लाईफलाईन मानली जाते. कोरोनामुळे मुंबईतील लोकलसेवा गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलच्या विशेष फेऱ्या सुरू आहेत. त्यातच आता लोकल सेवा नियमितपणे सुरु होण्याची प्रतिक्षा करत असलेल्या लाखो प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी मध्य रेल्वेनं दिली आहे.

काही नियम आणि अटी ठेवून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करता येईल. मात्र, त्यासाठी राज्य सरकारची परवानगी दिल्यास लोकल त्वरित सुरु करु, असं रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मध्य रेल्वेकडून गुरुवारी एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल  यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले आहे. गोयल हे मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनचे ते विभागीय व्यवस्थापक आहेत. 

लोकल सुरु करा, अशी प्रवाशांची मागणी आहे. लोकल वाहतूक सुरु करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या लोकल फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु आहे. मात्र, राज्य सरकारने मागणी केल्यास लोकल त्वरित सुरु करु, असं स्पष्टीकरण  गोयल यांनी दिलं. 

हेही वाचाः  मध्य रेल्वे मार्गावर अखेर QR कोड स्कॅनिंग सुरू; 1 लाख 80 हजार 400 प्रवाशांना QR कोड वितरीत

तसंच  राज्य सरकारने हिरवा कंदील दिल्यास आम्ही लोकल सुरू करू. मात्र राज्य सरकारने लोकल सुरू करण्याची मागणी रेल्वे मंत्रालयाकडे करायला हवी. ती मागणी रेल्वे मंत्रालयाने मान्य केली आणि तसे आम्हाला कळवल्यास लगेचच लोकल सुरु करु शकतो, असंही ते म्हणाले.

अधिक वाचाः  लोकल ट्रेनमध्ये बेकादेशीर प्रवास करत असाल तर सावधान! तिकिट तपासणीसांची दंडात्मक कारवाई सुरु

राज्य सरकारने कधीही मागणी केल्यास त्वरित लोकल सुरू करण्याची आमची पूर्ण तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. लोकल सुरू झाल्यास सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं कसं पालन केलं जाईल, याबाबत विचारले असता त्यांनी म्हटलं की, आता ज्याप्रमाणे स्टेशनवर प्रवाशांनी कुठे उभे राहायचे यासाठी मार्किंग करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे सर्व स्टेशनवर मार्किंग करून प्रवाशांना उभे राहण्यास आवाहन करण्यात येईल. तसेच प्रसारमाध्यमांच्या मदतीने लोकलमध्ये देखील सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यास आम्ही आवाहन देखील करु.

लॉकडाऊननंतर १५ जून रोजी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल ट्रेन सुरु करण्यात आल्या. सध्या केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी म्हणजेच पोलिस, नर्स, डॉक्टर, पालिकेचे सफाई आणि इतर कर्मचारी, पत्रकार अशा काही ठराविक कर्मचारीच लोकल ट्रेननं प्रवास करु शकतात.  सर्वसामान्य प्रवाशांना अद्याप लोकलने प्रवास करण्याची परवानगी नाही आहे.

Central Railway local train services and are only waiting for the government


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central Railway local train services and are only waiting for the government