Big News - अकरावी प्रवेशाची नोंदणी 15 जुलैपासून, जाणून घ्या नोंदणीसाठीचं वेळापत्रक 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 July 2020

दहावी निकालाची तारीख अद्याप ठरली नसतानाच शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाची तयारी आता सुरू झाली आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी 1 जुलैपासून महाविद्यालय नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.

मुंबई : दहावी निकालाची तारीख अद्याप ठरली नसतानाच शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाची तयारी आता सुरू झाली आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी 1 जुलैपासून महाविद्यालय नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. तर विद्यार्थ्यांना 15 जुलैपासून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. वेबसाइटवर दक्षिण, पश्चिम आणि उत्तर मुंबईतील महाविद्यालयाला 1 जुलैला तर ठाणे, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर महापालिकेतील महाविद्यालय 2 जुलैला वेबसाइटवर नोंदणी करू शकणार आहे.

BIG NEWS - कोरोनाच्या पाश्वभूमीवर कंटेनमेंट क्षेत्रातील नागरिक धास्तावलेत, उचलतायत 'हे' मोठं पाऊल...

या महाविद्यालयाचा तपशील उपसंचालक कार्यालयातून तपासून घेऊन अंतिम करण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना 15 जुलैपासून पालकांच्या मदतीने नोंदणी करू शकणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना माहिती मान्यतेसाठी शाळा किंवा मार्गदर्शन केंद्राची निवड करता येणार आहे. तसेच भाग 1 भरता येणार आहे. यानंतर 16 जुलैपासून निकाल जाहीर होईपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांचा भाग 1 पूर्ण करता येऊ शकेल.

तर भाग 2 मध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालय पसंतीक्रम देण्यासाठी दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर झाल्यानंतर संधी मिळणार आहे. यंदा ही प्रक्रिया शाळांमधून न होता विद्यार्थ्यांना पालकांच्या मदतीने पूर्ण करून घ्यावी लागणार आहे. तर माहिती पुस्तकही ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. यानंतरचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असे शिक्षण विभागाने कळविले आहे.

अकरावी प्रवेशाची वेबसाइट - http://mumbai.11thadmission.org.in

आरक्षणातील बदल 

  • मागील वर्षी सामाजिक, शैक्षणिक मागास प्रवर्गाकरता (एसईबीसी) 16 टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. यंदा शासन निर्णयानुसार हे प्रमाण 12 टक्के करण्यात आले. 
  • अपंग विद्यार्थ्यांसाठी तीन टक्के जागा राखीव होत्या. हे प्रमाण आता चार टक्के करण्यात आले आहे.
  • प्रवेश फेऱ्यांचे स्वरूप
  • द्विलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेश शून्य फेरीत न करता नियमित फेरीत करण्यात येतील.
  • नियमित फेऱ्यांनंतर आवश्यकतेनुसार विशेष प्रवेश फेऱ्या होतील.
  • विशेष फेऱ्यांतील प्रवेश आरक्षणाऐवजी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार होतील.
  • नियमित फेऱ्यांमध्ये पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी विशेष फेरीमध्ये सहभागी होऊ शकतील.

सर्वात मोठी बातमी - मुंबईत पुढील १५ दिवस कडक संचारबंदी, मुंबई पोलिस म्हणतात...

प्रवेश प्रक्रियेतील बदल

अकरावी प्रवेशासाठी नियमित फेऱ्या पार पडल्यानंतर ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या फेरीचे नियोजन केले जाते. मात्र कमी कालावधीत प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टीने यंदा ही फेरी रद्द करण्यात आली आहे. 

first year junior college admission process will start from 15th july check timetable

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first year junior college admission process will start from 15th july check timetable