कोरोनाच्या पाश्वभूमीवर कंटेनमेंट क्षेत्रातील नागरिक धास्तावलेत, उचलतायत 'हे' मोठं पाऊल...

कोरोनाच्या पाश्वभूमीवर कंटेनमेंट क्षेत्रातील नागरिक धास्तावलेत, उचलतायत 'हे' मोठं पाऊल...

मुंबई : मुंबईत प्रतिबंधित क्षेत्रे आणि इमारती सील होण्याचे प्रमाण वाढू लागले असून आपला जीव वाचविण्यासाठी लोक ग्रीन झोन मधील आपल्या नातेवाईकांकडे किंवा सेकंड होममध्ये राहण्यासाठी जात आहेत. अशा स्थलांतरितांचे प्रमाण वाढू लागले आहे. कोरोनाचे रुग्ण आढलेले परिसर सील केले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. मुंबईत ७५० कंटेन्मेंट झोन असून ५८७५ इमारती सील केल्या आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएसआर) तत्वानुसार पालिका आयुक्तांनी नियमात काही बदल केले आहेत. त्यामुळे आता कोरोना रुग्ण आढळून येईल ते घर अथवा इमारतीचा भाग (मजला) सीलबंद केला जातो. अशा सील झालेल्या इमारतीत राहणारे लोक कोरोनाच्या भीतीच्या छायेत जगत आहेत. 

सील केलेल्या इमारती किंवा घरे यांच्या शेजारी राहणारे नागरिक कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने आता आपल्या नातेवाईकांकडे किंवा आपल्या सेकंड होममध्ये सुरक्षित राहण्यासाठी जाणे पसंत करीत आहेत. गेल्या पंधरा दिवसात कंटेन्मेंट झोनमधील बहुतांश नागरिकांनी स्थलांतर केले आहे. सेकंड होम नसलेले नागरिक आणि नातेवाईक जवळ नसलेले नागरिक आहे त्याच ठिकाणी जीव मुठीत घेऊन दिवस ढकलीत आहेत. 

काही इमारतीत तीन ते चार कुटुंबे क्वारंटाईन आहेत. तेथील रहिवाशी भयभीत आहेत. पालिकेची आरोग्य यंत्रणा वाढत्या कोरोनापुढे तोकडी पडत आहे. महिन्याभरातून एखादं दोनदा औषध फवारणी केली जाते. तात्काळ तपासणी आणि उपचार होत नसल्याने रुग्ण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.

people from contentment zones are migrating to their second homes or staying with relatives

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com