Fisheries Sector
Fisheries Sectoresakal

मच्छीमारांसाठी आनंदीची बातमी! मत्स्यव्यवसायाला मिळणार कृषी क्षेत्राचा दर्जा; सुधीर मुनगंटीवारांनी दिले महत्त्वाचे निर्देश

मत्स्यव्यवसाय क्षेत्रास कृषी क्षेत्राचा दर्जा दिल्यास त्याचा मच्छीमारांना मोठा फायदा होणार आहे.
Summary

येत्या १५ दिवसांत राज्य मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

मुंबई : मत्स्यव्यवसाय क्षेत्रास कृषी क्षेत्राचा दर्जा देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळासमोर (Ministry of Fisheries Department) येत्या १५ दिवसांत प्रस्ताव सादर करा, असे निर्देश वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.

मत्स्यव्यवसाय क्षेत्रास कृषी क्षेत्राचा (Agricultural Sector) दर्जा द्यावा, अशी मागणी भाजप विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी अधिवेशनादरम्यान लक्षवेधीद्वारे केली होती. त्यानुसार काल मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली.

बैठकीत मत्स्यव्यवसाय क्षेत्रास कृषी क्षेत्राचा दर्जा दिल्यास त्याचा मच्छीमारांना मोठा फायदा होणार असून त्याबाबत येत्या १५ दिवसांत राज्य मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले आहेत. प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यास शेती व्यवसायाला जे फायदे होतात व ज्या सवलती मिळतात त्या मच्छीमारांना लागू होऊ शकतील.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com