पनवेलनजीक अपघातात पाच जणांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

पनवेल : बंद पडलेली मोटार ढकलून नेत असताना टेम्पोने धडक दिल्याने पाच जणांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी (ता. 30) पहाटे चार वाजता हा अपघात झाला. मृत मानखुर्द येथील मंडाळे परिसरातील रहिवासी होते. ते लग्न सोहळ्यासाठी पुण्याला निघाले होते. 

संतोष प्रजापती (वय 40), राशिद खान (24), दिनेश जैसवाल (30), जुम्मन अली (45) आणि अज्योध्या यादव (25) अशी मृतांची नावे आहेत. जखमी झालेले रामचंद्र यादव (25) यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

पुणे येथे लग्नासाठी जाण्याकरिता मानखुर्द मंडाळे येथील आठ जण मोटारीने निघाले होते. संजय राजभर (28) हा मोटार चालवत होता. पहाटे ते पनवेलपासून काही अंतरावरील मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवरील देवद गावाजवळ पोहचले. त्या वेळी त्यांची मोटार बंद पडली. ती दुरुस्त करण्यासाठी सर्वजण मोटारीतून उतरले आणि मोटारीला धक्का देत कळंबोलीच्या दिशेने निघाले. त्याच वेळी कलिंगडने भरलेल्या भरधाव टेम्पोने मोटारीसह प्रवाशांना जोरदार धडक दिली.

अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिस दुर्घटनास्थळी पोहचले. मात्र, या भीषण अपघातात मोटारीला धक्का देणाऱ्यांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला. इतर जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असताना त्यातील दोघांचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती गंभीर असल्याचे तेथील वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. मोटार चालक राजभर आणि मंदरिका प्रसाद (36) या दोघांना मात्र दुखापत झाली नाही. दरम्यान, अपघातानंतर टेम्पोचालक आणि क्‍लिनर पळून गेले आहेत. खांदेश्‍वर पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 

Web Title: Five dead in an accident near Panvel