म्हणून 'त्या' पाच मुली देणार कोरोनाची अग्निपरीक्षा, जाणून घ्या अधिक...

म्हणून 'त्या' पाच मुली देणार कोरोनाची अग्निपरीक्षा, जाणून घ्या अधिक...

जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. त्यातच देशभरातही कोरोनाबाधितांचा आकडाही दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. आजपासून देशभरात तिसऱ्या लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. त्यासोबतच कोरोनाबाधितांचा आकडा आता 42 हजारच्या पार गेला आहे. देशात कोरोना रुग्णांचा आकडा 42,533 झाली असून ज्यात 29,453 रुग्ण सक्रिय आहेत. त्यापैकी 11, 706 रुग्ण बरे झालेत. देशात आतापर्यंत 1373 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचदरम्यान, एक मोठी धक्कादायक बातमी समोर येतेय.

अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटलेल्या 5 मुलींची कोरोना फायर टेस्ट करण्यात येणार आहे. आता कोरोनाच्या चौकशीसाठी या पाच मुलींचे नमुने पाठवण्यात आलेत. या मुलींचा अहवाल आल्यानंतरच पुढची कारवाई केली जाईल आणि त्यानंतरच त्यांना घरी पाठवण्यात येईल. दैनिक हिंदुस्तान या वृत्तपत्रात या संदर्भातली माहिती देण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये या सर्व महिलांचं अपहरण करण्यात आलं होतं. पोलिसांनी या सर्व महिलांची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली. सुटका झाल्यानंतर त्यांना आशा केंद्रात ठेवलं गेलं. आता या मुलींची कोरोना व्हायरसची चाचणी घेण्यात आली आहे.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पाच मुलींना लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्या वैद्यकीय तपासणीबरोबरच 164चे विधान नोंदवल्यानंतरच या मुलींना कोर्टाच्या आदेशानुसारच घरी पाठवता येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना या मुलींना कोरोनाची चाचणी न करता घरी पाठवलं तर कोरोना व्हायरस बऱ्याच लोकांमध्ये परसण्याची शक्यता आहे. यासाठीच या मुलींची कोरोनाची तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे.

या पाचही मुलींचा अहवाल आल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि कोर्टाचे आदेश आल्यानंतर घरी पाठवता येईल. या मुलींना आधीच अपहरण झाल्याच्या भीतीमुळे धक्का बसला आहे. त्यातच अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटल्यानंतरही या सर्व अशा गोष्टींचा सामना करावा लागत असल्यानं मुलींच्या चिंतेत भर पडली आहे. 

five females to give corona fire test read full story here

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com