esakal | पुतण्याचं मुख्यमंत्री काकांना पत्र, कोरोना रुग्णांसाठी राज्य सरकारला सुचवले 'हे' उपाय
sakal

बोलून बातमी शोधा

पुतण्याचं मुख्यमंत्री काकांना पत्र, कोरोना रुग्णांसाठी राज्य सरकारला सुचवले 'हे' उपाय

जगभरात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. त्यातच देशभरातील कोरोना व्हायरसमुळे उद्धभवलेली परिस्थिती पाहता केंद्र सरकारनं तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढवलं आहे.

पुतण्याचं मुख्यमंत्री काकांना पत्र, कोरोना रुग्णांसाठी राज्य सरकारला सुचवले 'हे' उपाय

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबईः जगभरात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. त्यातच देशभरातील कोरोना व्हायरसमुळे उद्धभवलेली परिस्थिती पाहता केंद्र सरकारनं तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढवलं आहे. महाराष्ट्र राज्यातही कोरोना व्हायरसनं थैमानं घातलं आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या ही महाराष्ट्रात आहे. तसंच महाराष्ट्राची आकडेवारी पाहता मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ही जास्त आहे. याच पार्श महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात अमित ठाकरे यांनी आपल्या काकांना कोरोनावर काही उपाय सुचवले आहेत. दरम्यान मनसेचं नेतेपद स्विकारल्यानंतर अमित ठाकरेंनी पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. एवढंच काय तर अमित ठाकरेंनी या पत्रात राज्य सरकारकडून अनेक चांगले प्रयत्न करण्यात येत असल्याचं नमूद सुद्धा केलं आहे.

घृणास्पद ! कामाच्या दुसऱ्याच दिवशी 34 वर्षीय डॉक्टरकडून 45 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णासोबत...

यात अमित ठाकरेंनी कोरोना रुग्णांच्या अडचणी देखील पत्रात मांडल्या आहेत. राज्यात कोरोना व्हायरस आणि अन्य आजारांच्या उपचारासाठी जी रुग्णालयं कार्यरत आहे. त्या रुग्णालयांमध्ये बे़ड्सची क्षमता किती आहे याची स्पष्टपणे माहिती नागरिकांना नाही आहे. त्यामुळे आमच्याकडे बेड उपलब्ध नाहीत, दुसऱ्या रुग्णालयात जा असं सांगून नागरिकांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवलं जात असल्याचं समोर आलं आहे. ऐन आजारात एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात पाठवलं जात असल्यानं रुग्णांची धावपळ होते. त्यामुळे यावर उपाय योजना कराव्यात असं पत्रात म्हटलं आहे. 


या प्रकारामुळे इतर रुग्णांचा त्रास कमी व्हावा यासाठी अमित ठाकरेंनी पत्र लिहिलं आणि राज्य सरकारला उपाय सुचवला आहे. सरकारनं तंत्रज्ञानाचा उपयोग करुन प्रत्येक रुग्णालयाची ऑनलाईन माहिती उपलब्ध व्हावी, अशी मागणी अमित ठाकरे यांनी पत्रात केली आहे.

सावधान ! सारखा सारखा अकाउंट बॅलन्स चेक कराल तर बसेल फटका...

अमित ठाकरेंनी काय म्हटलं पत्रात

या पत्रात अमित ठाकरेंनी एक उपाय सुचवला आहे. कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार विविध पातळीवर उपाययोजना करत आहे. पण या आजाराचा प्रादुर्भाव सर्वसामान्य व्यक्तींना झाला तर त्यांनी काय करावं यावर काम करण्याची गरज आहे. राज्य सरकारनं यासाठी हेल्पलाईन सुरु केली आहे. याची मला पूर्णपणे माहिती आहे. मात्र तरीही अनेक नागरिकांना हा आजार झाल्यानंतर काय करावं, कुठं जावं हे कळत नाही. यासंदर्भात मनसेकडे असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आजारी रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांची मनःस्थिती बिकट असते. अशातच उपचारा दरम्यान अनेक नागरिकांना आमच्या रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत, तुम्ही दुसऱ्या रुग्णालयात जा असं सांगण्यात येतं. त्यांना या स्थितीत काय करावं, हे सूचत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत तंत्रज्ञानाचा उपयोग करुन सर्व रुग्णालयाची माहिती अॅपवर उपलब्ध करावी.

सध्याच्या युगात सगळ्यांकडे अँन्ड्रॉईड फोन आहेत. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा त्रास कमी करण्यासाटी एक खास अॅप तयार करण्याची मागणी अमित ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कोविड 19 आणि इतर रुग्णालयांची माहिती असणारं अॅप उपलब्ध झालं तर नागरिकांना माहिती मिळणं सोयीस्कर होईल. ज्यामुळे त्या अॅपद्वारे लोकांना रुग्णालयात जागा उपलब्ध आहेत की नाही याची माहिती मिळेल आणि सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास देखील कमी होईल. यासाठी अशा पद्धतीच्या अॅपची निर्मिती करावी, अशी मागणी अमित ठाकरेंनी केली आहे.

शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र आणि म्हटलं...

याआधी अमित ठाकरेंनी डॉक्टरांना चार हजार हायप्रोटिन्सयुक्त खाद्यपदार्थांच्या पॅकेट्सची मदत केली होती. निवासी डॉक्टरांना PPE किट्स, मास्क आणि बेडशिट्स वाटप केले होते.

amit thackeray writes a letter to CM uddhav thackeray