
5 girls escape from orphanage in Panvel
ESakal
पनवेल : पनवेल येथील ‘स्वप्नालय’ मुलींच्या बालगृहातून १२ ते १७ वयोगटातील पाच मुलींनी गत रविवारी (ता. २८) पहाटेच्या सुमारास खिडकीचे ग्रील तोडून पलायन केल्याची घटना घडली. पनवेल शहर पोलिसांनी तातडीने शोधकार्य सुरू करीत मुंबई, उपनगर रेल्वे पोलीस आणि इतर तपास यंत्रणांशी समन्वय साधून चार मुलींना शोधून काढले. या बालगृहात मुलींना मनाप्रमाणे राहायला मिळत नसल्याने त्या पळून गेल्याचे त्यांनी सांगितले.