कोरोना पॉझिटिव्ह मयत व्यक्तीच्या संपर्कात आले; पाच जणांना झाली कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 एप्रिल 2020

ठाणे पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मधूमेहाच्या उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाचा गेल्या आठवडयात मृत्यू झाला होता

ठाणे, ता. 25 : ठाणे पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मधूमेहाच्या उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाचा गेल्या आठवडयात मृत्यू झाला होता. मात्र मृत्यूनंतर त्याचा कोरोनाचा अहवाल मिळाल्यानंतर हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 60 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. रुग्णाच्या संपर्कातील सुमारे पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.

गेल्या आठवड्यात लोकमान्य नगर परिसरातील पाडा क्रमांक 4 येथील एका रुग्णाला उपचारासाठी पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु दुसऱ्या दिवशीच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर रुग्णालय प्रशासनाने त्याचा मृतदेह घरच्यांच्या ताब्यात दिला. मृत्यूनंतर दोन दिवसांची त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझीटीव्ह आला. 

सर्वात मोठा दावा; कोरोनावर होमियोपॅथीचे उपचार गुणकारी, गोळ्यांचं नाव आहे...

त्यामुळे लोकमान्य नगर, सावरकर नगर, शास्त्रीनगर बंद करण्यात आले. त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन 60 हून अधिक नागरीकांना पालिकेच्या माध्यमातून क्वॉरान्टाइन करण्यात आले. त्याच्या संपर्कात आलेल्या कळवा रुग्णालयातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. क्वॉरान्टाइन केलेल्यांपैकी 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

आता तिसरा लॉक डाऊन, कारण लॉक डाऊन आता जून पर्यंत वाढणार?

विलगीकरण कक्षात 50 जण

सीपी तलाव परिसरातील एका तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्या वडीलांना आणि कुटुंबातील अन्य दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे पालिकेने स्पष्ट केले. या सर्वाच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटंबातील सुमारे 50 नागरीकांना पालिकेने शोधून त्यांनाही विलगीकरण कक्षात ठेवले आहे.

five people detected corona positive after getting in touch with corona positive demised person


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five people detected corona positive after getting in touch with corona positive demised person