Ulhasnagar News : उल्हासनगरातील परिवहन सेवेच्या ए.सी-नॉन ए.सी बसचे तिकीट दर निश्चित

गेल्या 10 वर्षांपासून ठप्प पडलेली उल्हासनगर महानगरपालिकेची परिवहन सेवा सुरू करण्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे
Fixed AC-Non AC Bus Ticket Fares of Ulhasnagar Transport Service
Fixed AC-Non AC Bus Ticket Fares of Ulhasnagar Transport ServiceSakal

उल्हासनगर : गेल्या 10 वर्षांपासून ठप्प पडलेली उल्हासनगर महानगरपालिकेची परिवहन सेवा सुरू करण्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे.त्याकरिता लागणाऱ्या बसच्या ए.सी आणि नॉन ए.सी तिकिटाच्या दरावर आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आल्याने बसेस धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.आयुक्त अजीज शेख,उपआयुक्त परिवहन अशोक नाईकवाडे यांनी ही माहिती दिली.

केष्ट्रल कंपनीचे राजा गेमनानी हे 2009 ते 2014 या कालावधीत करार तत्वावर पालिकेची परिवहन सेवा हाताळत होते.मात्र सातत्याने पेट्रोलची दरवाढ होत असताना वारंवार प्रवासी भाड्यात भाडेवाढ करून देण्याच्या मागणीकडे डोळेझाकपणा करण्यात येत असल्याने गेमनानी यांनी परिवहन सेवेचा गाशा गुंडाळला होता.

2014 पासून महानगरपालिकेने अनेकदा परिवहन सेवा सुरू करण्याच्या निविदा प्रक्रिया प्रक्रिया हाताळल्या.पण त्यासाठी कुणीही कंत्राटदार पुढे येत नव्हता.अशावेळी अजीज शेख यांनी आयुक्त पदाचा पदभार हाती घेतल्यावर त्यांनी परिवहन उपआयुक्त अशोक नाईकवाडे व वाहन व्यवस्थापक विनोद केणे यांना परिवहन सेवेच्या निविदेवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले.

त्याचे फलित मिळाले आणि पुण्याच्या कंपनीला परिवहन सेवा हाताळण्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले.कंपनीने प्रथम पुण्यातील भोसरीमध्ये 20 बसेस तयार करण्याचे काम सुरू केले आहे.त्यापैकी धावण्यासाठी सज्ज असलेल्या बसेस उल्हासनगरात दाखल झालेल्या आहेत.

बाकी बसेस लवकरच येणार असून त्यासाठी मंत्रालयातून तिकीट दर निश्चित करणे आवश्यक होते.त्यानुसार आज मंत्रालयात मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाची बैठक अपर मुख्य सचिव (परिवहन)यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

राज्याचे परिवहन आयुक्त,सहा.पोलिस आयुक्त(वाहतूक),सचिव, राज्य परिवहन प्राधिकरण तथा अपर परिवहन आयुक्त,सचिव,मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण,उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजिज शेख,उपआयुक्त वाहन अशोक नाईकवाडे,वाहन विभागप्रमुख विनोद केणे उपस्थित होते.

सदर बैठकीत उल्हासनगर महानगरपालिका ई बसच्या तिकिट दराच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे.त्यानुसार उल्हासनगर परिवहन उपक्रमाच्या नागरीकांकडून ए.सी व नॉन ए.सी बससाठी भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत.

यात 2 किलोमीटर अंतरासाठी नॉन ए.सी 5 व ए.सी करिता 10 रुपये,हे दर टप्याटप्याने वाढणार असून 28 किलोमीटर अंतरासाठी नॉन ए.सी 35 आणि ए.सी करिता 45 रुपये असा दर असणार आहे.महिला व दिव्यांगांसाठी सवलत देण्यात येणार असून तशी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे आयुक्त अजीज शेख यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com