फ्लेमिंगो, खारपूटींवर तिसऱ्या डोळ्याची नजर; MMR परिसरात 100 सीसीटीव्ही बसवणार

flemingo
flemingogoogle

मुंबई : मुंबईतील असामाजिक घटकांचा फटका निसर्गाला ही बसत आहे. फ्लेमिंगो (Flemingo bird) आणि खारपूटिंच्या संरक्षणासाठी 100 सीसीटीव्ह कॅमेरा (CCTV camera) बसवण्यात येणार आहे. पुढील वर्षभरात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे खारफुटीसह फ्लेमिंगो पक्षांना संरक्षण मिळणार असल्याचे मँग्रोव्हज सेलचे मुख्य वन संरक्षक वीरेंद्र तिवारी (Virendra tiwari) यांनी सांगितले.

flemingo
ताडदेव आरटीओत होतोय मोठा भ्रष्टाचार ? मनसे वाहतूक संघटनेचा आरोप

मुंबई,ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये खारफुटीचे मोठे जंगल आहे. यातील बऱ्याच ठिकाणी परदेशातून फ्लेमिंगो पक्षी देखील येत असतात. यामुळे निसर्ग अधिक खुलून येत असून निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार बघायला मिळतात. मात्र अलीकडे खारपुटीची तोड होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. खाडी परिसर तसेच खारफुतटिंच्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य वाढले आहे. याचा परिणाम फ्लेमिंगो पक्षांच्या संख्येवर देखील झाला आहे. हे सर्व रोखण्यासाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय झाला असुन त्यासाठी 40 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

मुंबई महानगर प्रदेश परिसरात मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांचा समावेश आहे. या परिसरतील 100 स्थळ सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासाठी निर्धारित करण्यात आली आहेत. यामध्ये मुंबई,ठाणे,भिवंडी, नवी मुंबईचा समावेश आहे. निसर्गाची सुरक्षा आणि संरक्षणाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी 250 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येणार आहेत. यासाठी सल्लागार समिती नेमण्यात आली असून त्यांच्यामाध्यमातून सर्वेक्षण देखील सुरू करण्यात आले असल्याची माहिती मँग्रोव्हज सेलच्या उप मुख्य वनसंरक्षक निनू सोमराज यांनी दिली.

तीन प्रकारचे कॅमेरा

या परीसरातील प्रत्येक हालचालींची नोंद व्हावी यासाठी तीन प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येणार आहेत. नंबर प्लेट डिटेक्शन कॅमेरा,360 वर्तुळात फिरणारा कॅमेरा आणि झुम च्या माध्यमातून बारीक बारीक वस्तू टिपणारा कॅमेरा बसवण्यात येणार आहेत.

कुठे किती कॅमेरा

मुंबई शहर - 70

मुंबई उपनगर - 70

ठाणे - 40

भिवंडी - 30

नवी मुंबई - 40

"खारफुटीसह फ्लेमिंगो पक्षांचे संरक्षण आमची जबाबदारी आहे. प्रकल्पासाठी आणखी एक सल्लागार नेमला आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून वर्षभरात प्रकल्प पूर्ण करू."

-वीरेंद्र तिवारी , मुख्य वनसंरक्षक ,मँग्रोव्हस सेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com