आम्ही कटिबद्ध आहोत, मनसेच्या इशाऱ्यानंतर फ्लिटकार्टचं आश्वासन

पूजा विचारे
Sunday, 18 October 2020

अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांनी ऑनलाईन शॉपिंग अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा, अशी मागणी मनसेनं केली होती. आता फ्लिपकार्टनं मनसेचा धसका घेत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबईः  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला इशारा देत दोन कंपन्यांना सात दिवसांची मुदत दिली होती. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांनी ऑनलाईन शॉपिंग अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा, अशी मागणी मनसेनं केली होती. आता फ्लिपकार्टनं मनसेचा धसका घेत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

ग्राहकांना नवनवीन आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पूर्णपणे स्वदेशी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेली फ्लिपकार्ट भारतात ई-कॉमर्स सर्वदूर पोहोचवण्यासाठी,  तसेच या उद्योगात लोकशाहीप्रमाणे काम करण्यास कटिबद्ध आहोत, असं फ्लिपकार्टने मनसेच्या इशाऱ्यानंतर म्हटलं आहे. 

सध्या फ्लिटकार्टच्या अॅपमध्ये  उपलब्ध असलेल्या भाषांव्यतिरिक्त अन्य भाषांचाही  प्लॅटफॉर्मवर समावेश असेल. भारतात विविध भागात पोहोचण्यासाठी विविध भाषा आणि व्हॉइस सॉल्यूशनचा वापर फ्लिपकार्टकडून करण्यात येणार असून मातृभाषेच्या वापरामुळे मोठ्या संख्येने ग्राहक आकर्षित होतील, याशिवाय लघु आणि मध्यम उद्योजक आणि कारागिरांना एक मोठा बाजारपेठ उपलब्ध होईल, असे फ्लिपकार्टच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.

अधिक वाचाः  VIDEO:अंधेरीत बर्निंग कारचा थरारक व्हिडिओ, कार जळून खाक

मनसेनं दिला होता इशारा

सात दिवसांच्या आता जर दोन्ही कंपन्यांनी आपल्या अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश केला नाही तर मनसे स्टाईल समाचार घेऊ, अशा इशारा मनसेनं दिला होता.  मनसेने या कंपन्यांच्या ऑफिसला गुरुवारी भेट दिली होती. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग कंपनीच्या मुंबईतील बीकेसीमधील ऑफिसमध्ये जाऊन मनसेने आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी मनसे नेता अखिल चित्रे यांनी स्टाफला खडे बोलही सुनावले. 16 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवर फेस्टिव्ह सेल सुरु झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक प्रॉडक्ट्सवर मोठी सूट दिली जात आहे.

Flipkart reacted After MNS warning marathi Language


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flipkart reacted After MNS warning marathi Language