तरंगत्या हॉटेलची बोट कलंडली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

मुंबई - वांद्रे-वरळी सागरी सेतूनजीकच्या समुद्रात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पुढाकाराने (एमटीडीसी) सुरू झालेल्या तरंगत्या हॉटेलची बोट शुक्रवारी सायंकाळी कलंडली. त्या वेळी बोटीवर 15 कर्मचारी होते. त्यांना मच्छीमारांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. बोटीला छिद्र पडल्याने ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

"एआरके हॉस्पिटॅलिटी'तर्फे या बोटीचे व्यवस्थापन केले जात होते. डागडुजीसाठी ही बोट भाऊचा धक्का येथे नेली जाणार होती. बोट आकाराने मोठी असल्याने समुद्राला भरती असणे आवश्‍यक होते. भरती नसल्याने बोट टोल नाक्‍याच्या काही अंतरावर समुद्रात नांगरून ठेवली होती. शुक्रवारी दुपारी जोरदार वाऱ्यामुळे बोटीचा अँकर निघाला. त्यानंतर बोट माहीमच्या दिशेला गेली. तेथील खडकाला बोटीचा खालचा भाग आदळल्याने छिद्र पडले. त्यामुळे बोट 15 अंशाने कलंडली, अशी माहिती बोटीवरील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली.

Web Title: Floating hotel boat accident