esakal | गणेशोत्सव निमित्त ठाण्यात फुलबाजार बहरला
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

गणेशोत्सव निमित्त ठाण्यात फुलबाजार बहरला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : विघ्नहर्ता गणरायाचे आगमन घरोघरी उत्साहात आहे. पावसाची (Rain) रिपरिप आणि कोरोनाचे (Corona) निर्बंध असले, तरी लाडक्या बाप्पाच्या आगमनाच्या तयारीसाठी गुरुवारी संपूर्ण दिवस ठाण्यातील (Thane) बाजारपेठेत (Market) खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती.

विशेषतः फूलबाजारात भाविकांमध्ये गणरायाला आवडणारी जास्वंदीची फुले, दूर्वा, विविध फुलांच्या कंठ्या, गजरे आदींच्या खरेदीची लगबग पाहायला मिळाली. मागील अनेक महिने धार्मिक स्थळे बंद असल्याने मंदीच्या सावटाखाली असणारा फूलबाजार गणेशोत्सवानिमित्त विविध रंगी फुलांनी आणि ग्राहकांनी अक्षरशः बहरून गेला. यंदा जांभळी नाका येथील फूल बाजारात गणेशोत्सवानिमित्त कल्याण, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सांगली या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात फुलांची आवक झाली आहे. सणांच्या दिवसात झेंडू, जास्वंद, गुलाब, गुलछडी, ऑर्किड फुलांना ग्राहकांची मागणी असते.

हेही वाचा: "ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प खूप चांगली जागा असल्याने पुन्हा पुन्हा येतो"

आपला बाप्पा सर्वात आकर्षक दिसावा, यासाठी विविध रंगी फुलांनी सजलेल्या कंठ्यानाही भाविक पसंती देतात. मात्र, यंदा नैसर्गिक फुलांच्या कंठ्या आणि हारांच्या किमतीत वाढ झाली आहे. सध्या बाजारात मध्यम आकाराची गुलाब कंठी ३०० रुपये, ऑर्किड फुलांची कंठी २५० रुपये, गुलछडी फुलांची कंठी १०० रुपये; तर झेंडू फुलाची कंठी १०० ते २५० रुपयांपर्यंत आहे.

हेही वाचा: तालिबान्यांचा अफगाणिस्तानच्या महिला क्रीडा स्पर्धांना विरोध

ठाण्यातील येऊर गावातील महिला सणांच्या निमित्ताने दूर्वा, केळीची पाने, गजरे इत्यादींची विक्री करीत आहेत. गौरी विसर्जनापर्यंत फुलांना मागणी असल्याने पुढचे काही दिवस फुलांचे दर तेजीत राहतील, असे ठाण्यातील फूलविक्रेत्यांनी सांगितले.

loading image
go to top