Mumbai News : फुले, फुगे अन् 'I Love You'... 'सुहागरात एक्स्प्रेस'चा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांचा सवाल, 'ही परवानगी कुणी दिली?'

एका नवविवाहित जोडप्यासाठी रेल्वेच्या फर्स्ट एसी कुपेचेच थेट 'रोमँटिक वेडिंग सूट'मध्ये रूपांतर करण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Suhagrat Express

Suhagrat Express

sakal

Updated on

- नितीन बिनेकर

मुंबई - लग्नानंतरची पहिली रात्र संस्मरणीय करण्यासाठी हॉटेल किंवा रिसॉर्टची निवड केली जाते. मात्र, एका नवविवाहित जोडप्यासाठी रेल्वेच्या फर्स्ट एसी कुपेचेच थेट 'रोमँटिक वेडिंग सूट'मध्ये रूपांतर करण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. फुले, फुगे, गुलाबाच्या पाकळ्या आणि आकर्षक रोषणाईने सजलेल्या या कुपेला नेटकऱ्यांनी प्रेमाने 'सुहागरात एक्स्प्रेस' असे नाव दिले आहे. मात्र, या आगळ्यावेगळ्या कल्पनेइतकीच त्यासाठी रेल्वेची अधिकृत परवानगी होती का, याचीही चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com