तेरड्यासह भांगरी, लीली बहरली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

रोहा : आषाढ महिन्यात रायगड जिल्ह्यातील धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी उसळली होती. आता श्रावण महिना सुरू होताच निसर्गप्रेमी पर्यटकांची ताम्हिणी घाटाचा पायथा, कुंडलिका नदी खोऱ्यासह डोंगर पठारांवर भ्रमंती सुरू झाली आहे. श्रावणात फुलणाऱ्या तेरड्यासह लीली, भांगरीच्या रंगीबेरंगी फुलांमुळे ही गर्दी आहे. आठवडाभरात त्यामध्ये मोठी वाढ होणार आहे. 

श्रावण सुरू झाला आहे. रायगड जिल्ह्यात ठिकाठिकाणी लालचुटुक तेराड्याची फुले फुलू लागली आहेत. भांगरीची पांढरट जांभळी फुलेसुद्धा फुलू लागली आहेत. पांढऱ्या फुलांची शेरवट वेलही बहरली आहे. धायरीची छोट्या देठाची लांबट तांबूस फुले फुलण्याच्या बेतात आहेत.

 वाकेरीचा लालसर लांब तुरा आकर्षित करत आहे. लवकरच रानकोरटीची जांभळी फुले फुलू लागतील. त्याचसोबत गायरी, कोंडानी, गोवेल याही जांभळ्या रंगाने बहरणार आहेत. भेंद्री हळूनद्र यांची जांभळट पिवळसर लांबलचक फुले खुलून दिसत आहेत. 

श्रावण महिन्यातच रस्त्याकडेला गर्दीत वाढणाऱ्या अळूची फुलेही फुलून वेगळे सौंदर्य दाखवतात. त्याचबरोबर कार्टुलीचा पिवळा बहर; तर कुर्डूचा जांभळा उभा तुराही फुलून येतो. श्रावणात फुलणारा हा निसर्गाचा इंद्रधनु पाहण्यासाठी मुंबई, पुण्यातील पर्यटकांची गर्दी ताम्हिणी घाटाच्या पायथ्याशी पाहायला मिळत आहे. डोंगर, पठारांवरही निसर्गप्रेमींची गर्दी होत आहे. 

कोकणातील निसर्गसौंदर्य डोंगराळ भागात दडलेले आहे. श्रावणात ते विविध फुलांच्या रूपाने पाहायला मिळते. इथल्या प्रत्येक हिरव्या पातीला कोणत्या ना कोणत्या रंगाचे फूल येते. ते पाहण्यासाठी आम्ही इथे येतो. 
- सुभाष काळण, पर्यटक 
 
पावसाळ्यात रायगड जिल्ह्यात विविध वनस्पतींना फुलोरा येतो. श्रावणात हा बहर शिगेला पोहोचतो. दोन महिने विविध फुलांचे हे सौंदर्य मनात साठवता येणार आहे. 
- कविता शिंदे, वनस्पती तज्ज्ञ 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flowers blossom in Raigad