

Direct Connectivity to Sindhudurg, Jalgaon, Goa and Agatti
esakal
गोवास्थित प्रादेशिक विमान कंपनी फ्लाय९१ने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सिंधुदुर्ग, जळगाव, गोवा आणि लक्षद्वीपमधील अगात्ती या चार महत्त्वाच्या ठिकाणांसाठी विमानसेवा सुरू केली आहे. हिवाळी वेळापत्रकाचा भाग म्हणून ही सेवा सुरू करण्यात आली असून, ५ ऑक्टोबर रोजी फ्लाय९१च्या विमानाचे नवी मुंबई विमानतळावर पहिले लँडिंग झाले. विशेष म्हणजे, या पहिल्या उड्डाणाचे संचालन संपूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांनी केले. विमानतळावर फ्लाय९१च्या विमानाचे ‘वॉटर कॅनन सॅल्युट’ देऊन स्वागत करण्यात आले.