ठाण्यात उड्डाणपुलाखाली उद्याने 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

ठाणे - ठाण्यातील उड्डाणपुलांखाली मोकळ्या जागेत राजरोसपणे होणारे बेकायदा वाहन पार्किंग, अपप्रवृत्तीकडून होणारा गैरवापर टाळण्यासाठी ठाणे महापालिकेने पुढाकार घेतला आहे. या पुलाखालील मोकळ्या जागांवर उद्याने निर्माण केली जात असून, या जागा आता झाडा-फुलांनी बहरणार आहेत. सुशोभीकरणाचे हे काम पालिका एका बड्या जाहिरात एजन्सीतर्फे करत आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

शहरात नितीन-कॅडबरी उड्डाणपूल, गोल्डन डाईज नाका उड्डाणपूल, मानपाडा उड्डाणपूल, तीन हात नाका आदी ठिकाणी उड्डाणपुलाखाली भरपूर मोकळी जागा आहे. या जागेवर वाहन पार्किंग करून ठेकेदार वसुली करतात. काही ठिकाणी जुन्या वाहनांचा व्यवसाय करणाऱ्यांनी जागेचा वापर सुरू केला होता. अनेकांनी गॅरेजही थाटली होती. शिवाय, रात्रीच्या वेळेस काही अपप्रवृत्तीचा वावर उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागांमध्ये होऊ लागल्याने परिसर बकाल बनले होते. मागील वर्षी तत्कालीन महापौरांनी महापालिका प्रशासनाकडे उड्डाणपुलाच्या या जागांवर उद्याने उभारण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुढाकार घेत मे. रौनक ॲडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून अंदाजे १० हजार चौरस मीटर मोकळ्या जागांवर उद्यान उभारण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यानात फुलझाडे व जॉगिंग ट्रॅकही उभारले जाणार असून काही दिवसांतच ही उद्याने नागरिकांसाठी खुली होतील, अशी माहिती पालिकेच्या उद्यान विभागाने दिली.

मुंबईनंतर ठाण्यात श्रीगणेशा
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य सरकारने उड्डाणपुलांखालील जागेचा गैरवापर होऊ नये, यासाठी त्या ठिकाणची सर्व बांधकामे, पार्किंगला हटवून उद्याने उभारावीत, असे आदेश दिले होते. मुंबईत याची अंमलबजावणी झाली असून, ठाण्यातही पालिकेने मनमोहक बगीचे फुलवण्याचा श्रीगणेशा केला आहे.

Web Title: Flyover down the garden