
मुंबई : सणासुदीच्या काळात मिठाई, फराळ आणि गोड पदार्थांची मागणी वाढते. मात्र, या काळात दुग्धजन्य पदार्थात भेसळ होण्याची शक्यता जास्त असल्याने अन्न व औषध प्रशासन (एफडीए)ने सणासुदीसाठी विशेष तपासणी मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेचा उद्देश नागरिकांना चांगल्या प्रतिची मिठाई व फराळ उपलब्ध होणे हा आहे. मात्र, ग्राहकांनीही मिठाई खरेदी करताना सजग राहण्याचे आवाहन एफडीए प्रशासनाने केले आहे. याशिवाय, मिठाईची मुदत संपण्याची ही तारीख त्यावर लिहावी असे आवाहन करण्यात आले आहे.