FDA : तळोजा येथील कारखान्यात भेसळयुक्त सॅनिटायझर; १८ लाखांचा साठा जप्त | Navi mumbai news update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FDA

FDA : तळोजा येथील कारखान्यात भेसळयुक्त सॅनिटायझर; १८ लाखांचा साठा जप्त

मुंबई : कोरोना संसर्गाने (corona infection) जोर पकडल्यानंतर पुन्हा एकदा हॅन्ड सॅनिटायझरची (hand sanitizer) मागणी वाढली आहे. याचा फायदा उचलत बनावट आणि भेसळयुक्त सॅनिटायझरची (Fake sanitizer seized) विक्री करण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अशा बनावट उत्पादनावर कारवाईचा बडगा उगारला आहे. (food and drug administration seized fake sanitizer stock in taloja factory)

हेही वाचा: राज्यात नव्या ७५ ओमिक्रॉनबाधितांची भर; तर मुंबईत ४० नवे रुग्ण

अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागास बनावट व भेसळयुक्त हँड सॅनिटाइझर चे उत्पादन तळोजा येथील एका कारखान्यात होत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. सदर माहितीची पडताळणी करून नवी मुंबईच्या तळोजा एमआयडीसीतील ए ए केमिकल या ठिकाणी प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभाग व रायगड कार्यालयाच्या संयुक्त पथकाने धाड टाकून कारवाई केली.

सदर कारवाईत कारखान्यास सौंदर्य प्रसाधने उत्पादनाचा परवाना प्राप्त असल्याचे आढळून आले. मात्र सदर ठिकाणी विविध प्रकारची व वेगवेगळ्या ब्रँड नावाने हँड सॅनिटाइझरचे विनाअनुमती, बनावट व भेसळ करून उत्पादन होत असल्याचे आढळून आले. सदर ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात 5 लिटर व 500 मि. ली. च्या डब्यात लेबल लावलेला विक्रीयोग्य हँड सॅनिटाइझरचा साठा उपलब्ध होता. उपलब्ध साठ्यातून 6 नमुने चाचणी विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित सुमारे 18.84 लाख रुपयाचा साठा औषधे सौंदर्य प्रसाधने साठा जप्त करण्यात आला.

सदर चाचणीसाठी घेण्यात आलेल्या सर्व नमुन्यांच्या प्राप्त अहवालानुसार ते बनावट असल्याचे आढळून आले असून त्यात मिथेनॉलची भेसळ करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. एका नमुन्यात कोणतेही अल्कोहोल नसून त्यात केवळ सुगंधित द्रव असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने कंपनीचे मालक चालक यांच्याविरोधात तळोजा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर संस्थेस त्वरित कामकाज बंद चे आदेश बजावण्यात आले असून तळोजा पोलीस व अन्न औषध प्रशासन, रायगड पुढील तपास करीत आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top