
शहापूर : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र प्राधान्य कुटुंब योजना तसेच अंत्योदय अन्न योजनेतील रेशनकार्डमध्ये ऑनलाइन नावनोंदणी असलेल्या सर्व सदस्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. असे असताना शहापूर तालुक्यातील ४३ हजार शिधापत्रिकाधारकांनी शिधापत्रिका ई-केवायसी करण्याकडे पाठ फिरवली आहे.