esakal | किळसवाणा प्रकार ! उत्कृष्ट जेवणाच्या नावाखाली क्वारंटाईन सेंटरमध्ये दिलं आळ्या आणि माशीयुक्त अन्न
sakal

बोलून बातमी शोधा

किळसवाणा प्रकार ! उत्कृष्ट जेवणाच्या नावाखाली क्वारंटाईन सेंटरमध्ये दिलं आळ्या आणि माशीयुक्त अन्न

मुंबई महापालिकेच्या चेंबूर मधील क्वारंटाईन सेंटर मधील रुग्णांना देण्यात येणाऱ्या सकस जेवणात चक्क अळ्या आणि माश्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

किळसवाणा प्रकार ! उत्कृष्ट जेवणाच्या नावाखाली क्वारंटाईन सेंटरमध्ये दिलं आळ्या आणि माशीयुक्त अन्न

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबई महापालिकेच्या चेंबूर मधील क्वारंटाईन सेंटर मधील रुग्णांना देण्यात येणाऱ्या सकस जेवणात चक्क अळ्या आणि माश्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दूषित जेवळ खाल्ल्याने काही लोकांना त्रास झाल्याचा आरोप केला आहे. क्वारंटाईन सेंटर मधील लोकांनी याविरोधात गोंधळ घातल्यानंतर या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश सहाय्यक आयुक्तांनी दिले.

चेंबूर 'एम वेस्ट' विभागात विष्णू नगर, न्यु म्हाडा कॉलनी या ठिकाणी पालिकेचे हे क्वारंटाईन सेंटर आहे. या सेंटरमध्ये चेंबूर परिसरातील 110 हुन अधिक लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. सेंटर मधील लोकांना सकाळ, संध्याकाळ नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण पालिकेकडून दिले जाते. बुधवारी दिलेले रात्रीचे जेवण हे निकृष्ट असल्याचा आरोप इथल्या लोकांनी केला आहे.

मोठी बातमी - कोरोना संसर्ग केवळ स्पर्शामुळेच होतो का ? उच्च न्यायालयाने केला महत्वपूर्ण सवाल...

पालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये देण्यात आलेल्या जेवणात अळ्या आणि माशी सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हे अन्न खाल्यानंतर लहान मुलांना उलट्या झाल्याने लोक खूप घाबरलेले आहेत. शिवाय इथले पाणी देखील अस्वच्छ असून त्यात मच्छर पडलेले आढळले असल्याचा आरोप ही लोकांनी केला आहे. 

महानगरपालिकेने संशयीत रुग्णांसाठी क्वारंटाईन तसेच आयसोलेशन सेंटर सुरू केले आहेत. यामधील संशयित रुग्णांवर गेल्या 3 महिन्यांपासून उपचार सुरू आहेत. त्यांना योग्य त्या सुविधा ही पुरवण्यात येत आहेत. कोरोना बाधित रुग्ण , त्यांचे कुटुंबीय तसेच रुग्णांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या रुग्णांना या सेंटरमध्ये क्वारंटाईन केलं जातं. या लोकांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत पालिका त्यांची सर्वोतोपरी काळजी घेते. क्वारंटाईन सेंटर मध्ये उत्कृष्ट सेवा देत असल्याचा दावा जरी पालिका करत असली तरी चेंबूर मधील या प्रकाराने पालिकेच्या दाव्याची पोलखोल केली आहे.

मोठी बातमी - सोसाट्याच्या वाऱ्याने झाड छप्पर तोडून पडलं १२ दिवसांच्या बाळाच्या पाळण्यावर, बाळही होतं त्यात पण...

 क्वारंटाईन सेंटर मधील या प्रकारानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ धाव घेत जेवणाची पाहणी केली.  या लोकांचं म्हणनं जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. आपल्याला यासंबंधी तक्रारी प्राप्त झाल्या असून आपण ठेकेदार बदलला असल्याची माहिती सहाय्यक अधिकारी पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

food served in chembur quarantine center is found to be unhygienic and with full of larvae

loading image
go to top