कोरोना संसर्ग केवळ स्पर्शामुळेच होतो का ? उच्च न्यायालयाने केला महत्वपूर्ण सवाल...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 June 2020

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर विमानातील दोन आसनांमधील एक आसन रिक्त न ठेवण्याच्या केंद्र सरकार आणि एअर इंडियाच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात वैमानिक देवेन कनानी यांनी याचिका दाखल केली.

मुंबई  : लॉकडाऊनमध्ये शिलिथता देत देशांतर्गत विमान वाहतूक सुरु झाली आहे. विमान प्रवासात प्रवाशांची सुरक्षा आणि सोशल डिस्टन्सिगचे पालन करणे, महत्वाचे असताना विमानातील दोन आसनांमधील आसन रिक्त न ठेवण्याचा निर्णय केंद्रीय नागरी उड्डयण मंत्रालयाने घेतला होता.

मोठी बातमी - जितेंद्र आव्हाडांनी थेट नरेंद्र मोदींकडे केली 'ही' मागणी...

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर विमानातील दोन आसनांमधील एक आसन रिक्त न ठेवण्याच्या केंद्र सरकार आणि एअर इंडियाच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात वैमानिक देवेन कनानी यांनी याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी आज न्या. एस. जे. काथावाला आणि न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. 

मोठी बातमी ः विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणात नवा ट्विस्ट, प्रत्यार्पणाची बातमी अफवा 

नागरी उड्डाण मंत्रालय आणि एअर इंडियाच्या वतीने प्रवासाबाबत घेण्यात येणाऱ्या सुरक्षा उपायांची माहिती खंडपीठाला देण्यात आली. स्पर्श टाळून दोन व्यक्तीमधील शारीरिक अंतर टाळता येते. तसेच प्रवाशांना सुरक्षित गाऊन आणि हातमोजे, मास्क असा पेहराव देण्यात येईल. ज्यामुळे स्पर्श किंवा अन्य प्रकारे ते सुरक्षित राहू शकतात, असा दावा नागरी उड्डाण मंत्रालयच्यावतीने करण्यात आला. विमान प्रवासातील सोशल डिस्टन्सिंग आणि सुरक्षेसंबंधित मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासाठी तज्ज्ञ समितीची नियुक्ती केन्द्र सरकारने केली आहे. या समितीने सुचवलेल्या सुरक्षा तत्वांची माहिती खंडपीठाला देण्यात आली. समितीच्यामते मधल्या आसनावर बसणाऱ्या प्रवाशाला विमानात प्रवेश करताना आणि बाहेर पडेपर्यंत सुरक्षेसाठी गाऊन दिला तर तो अनावश्यक स्पर्शापासून सुरक्षित राहू शकतो आणि संसर्गाचा धोका कमी होतो.

मोठी बातमी ः मंत्री अशोक चव्हाण यांचे १४ दिवसानंतरचे कोरोना रिपोर्ट आलेत, आता पुढील १४ दिवस...

नागरी उड्डयण मंत्रालय आणि तज्ज्ञ समितीने केलेल्या युक्तिवादावर बोलताना कोरोना बाधित व्यक्तीच्या केवळ स्पर्शानेच अन्य व्यक्ती कोरोना विषाणूने बाधित होऊ शकते का ? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. याबाबत शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीमध्ये खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने तज्ञ समितीला दिले आहेत.  विमानसेवेच्या सुरक्षेपेक्षा प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी व्यक्त केले आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai high court asked central goverment over social distancing in flight