Thane News: वारीच्या पावलांना 'थेरपीचा आधार'; उल्हासनगरच्या निलेश फालक यांची पंढरपुरमध्ये नि:स्वार्थ सेवा!

Pandharpur Wari: पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी झालेले हजारो वारकरी पायी चालत पंढरपूर गाठतात. अशा या थकलेल्या, पण श्रद्धेने ओथंबलेल्या वारकऱ्यांसाठी पंढरपुरात एक मोफत मसाज थेरपी सेवा सुरू आहे.
Pandharpur Wari Health Service
Pandharpur Wari Health ServiceESakal
Updated on

नवनीत बऱ्हाटे

उल्हासनगर : पायी प्रवासाचा थकवा, सुजलेले पाय, गुडघ्यांचे दुखणे... पण तरीही ओठांवर "रामकृष्ण हरि"चा जयघोष आणि डोळ्यांत फक्त विठ्ठलाचे दर्शन! पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी झालेले हजारो वारकरी आपल्या जीवतोड भक्तीने पायी चालत पंढरपूर गाठतात. अशा या थकलेल्या, पण श्रद्धेने ओथंबलेल्या वारकऱ्यांसाठी पंढरपुरातील वै. दिगंबर महाराज संस्थानात एक मोफत मसाज थेरपी सेवा सुरू आहे. विशेष म्हणजे ही सेवा उल्हासनगरचे सुप्रसिद्ध मसाज थेरपिस्ट निलेश फालक हे देत आहेत, जे दरवर्षी हा उपक्रम निःस्वार्थ भावनेने पंढरपुरमध्ये राबवत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com