कारगिल विजय दिवस : कलाकार विरुद्ध सैन्यदल संघात फुटबॉल सामना

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 जुलै 2019

फुटबॉल सामना 26 जुलैला कूपरेज मैदान, महर्षी कर्वे रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक क्षेत्र, नरिमन पॉईंट, मुंबई येथे संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. माजी सैनिक/विधवा तसेच कुटुंबियांना हा सामना पाहण्यासाठी मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

मुंबई : कारगिल विजय दिवस 26 जुलैला साजरा करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर हिंदी व मराठी सिनेमा/दूरदर्शन क्षेत्रातील कलाकार विरुद्ध सैन्यदल संघ यांच्यात फुटबॉल सामना रंगणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत  फुटबॉल सामना रंगणार आहे.

फुटबॉल सामना 26 जुलैला कूपरेज मैदान, महर्षी कर्वे रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक क्षेत्र, नरिमन पॉईंट, मुंबई येथे संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. माजी सैनिक/विधवा तसेच कुटुंबियांना हा सामना पाहण्यासाठी मोफत प्रवेश दिला जाणार आहे. मुंबई शहर, मुंबई उपगनर व ठाणे जिल्ह्यातील माजी सैनिक/ विधवा तसेच कुटुंबियांनी फुटबॉल सामना पाहण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Football match between actors and army mans on Kargil Vijay divas