esakal | हाफकिनमध्ये होणाऱ्या 'कोव्हॅक्सीन' लस निर्मितीबद्दल महत्त्वाची अपडेट

बोलून बातमी शोधा

haffkin
हाफकिनमध्ये होणाऱ्या 'कोव्हॅक्सीन' लस निर्मितीबद्दल महत्त्वाची अपडेट
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: 'कोव्हॅक्सीन' लस निर्मितीची परवानगी मिळालेल्या परेल येथील हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशनला राज्य सरकारने ९४ कोटी रुपये मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. हाफकिनमध्ये उभारल्या जाणाऱ्या लस निर्मिती प्रकल्पाचा एकूण खर्च १५४ कोटी रुपये आहे. कोव्हॅक्सीन ही कोरोना प्रतिबंधक लस आहे. भारत बायोटेकने विकसित केलेल्या या लसीची निर्मिती करायला केंद्राने हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशनने परवनागी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्याच्या आकस्मिक निधीतून प्रकल्पासाठी ९४ कोटी रुपये दिले जाणार आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. कोविड सुरक्षा योजनेतंर्गत केंद्र सरकार हाफकिन लस निर्मिती प्रकल्पासाठी ६५ कोटी रुपये देणार आहे. "विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या मदतीने हाफकिन मुंबईत परेलमध्ये हा प्रकल्प उभारणार आहे. भारत बायोटेकसोबत मिळून हाफकिन संस्थेचे तज्ञ कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करणार आहेत. राज्य सरकार प्रकल्पासाठी ९४ कोटीची निधी देणार आहे" असे मुख्यमंत्री कार्यालयातून जारी झालेल्या पत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा: डॉक्टरांची कमाल! तुटलेला हात पुन्हा रुग्णाच्या शरीराला जोडला

भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी हाफकिनने जानेवारी महिन्यात परवानगी मागितली होती. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या बायोटेक्नोलॉजी विभागाने १५ एप्रिलला ही परवानगी दिली. हाफकिन या प्रकल्पातून वर्षाला २२.८ कोटी लसींची निर्मिती करणार आहे.