

MNS support to Shinde shivsena in KDMC
ESakal
मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्तास्थापनेसाठी शिवसेना शिंदे गटाने खेळलेला राजकीय डाव अखेर यशस्वी ठरताना दिसत आहे. कोकण भवन येथे आज शिंदे गटाच्या ५३ नगरसेवकांनी अधिकृत गट स्थापन केला. त्याचवेळी मनसेच्या पाच नगरसेवकांनीही स्वतंत्र गट स्थापन करत थेट शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे केडीएमसीतील सत्तासमीकरणात शिंदे गटाचे पारडे अधिक जड झाले आहे.