

Ambernath Municipal Council
ESakal
ठाणे : काँग्रेसच्या नगरसेवकांच्या हाती कमळ देऊनही अंबरनाथ नगर परिषदेत सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे स्वप्न शिवसेना शिंदे गटाने धुळीस मिळवले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार आणि एक अपक्ष, अशी नवी मोट बांधत शिवसेना शिंदे गटाने ‘शिवसेना अंबरनाथ विकास महायुती स्थापन करीत’ ३२ नगरसेवकांच्या संख्याबळावर सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.