विमानतळावर महिनाभरात 88 लाखांचे परदेशी चलन जप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

मुंबई : परदेशी चलनाची तस्करी करणाऱ्यांना हवाई गुप्तचर विभागाने दणका दिला. महिनाभरात केलेल्या कारवाईत 88 लाखांचे परदेशी चलन त्यांनी जप्त केले.

मुंबई : परदेशी चलनाची तस्करी करणाऱ्यांना हवाई गुप्तचर विभागाने दणका दिला. महिनाभरात केलेल्या कारवाईत 88 लाखांचे परदेशी चलन त्यांनी जप्त केले.

परदेश दौरे, सहलीच्या नावाखाली परदेशातील तस्कर प्रवाशांना तेथील चलनी नोटा देऊन त्या बदल्यात सोने, वस्तूची खरेदी करायला भाग पाडत. अशा प्रवाशांवर हवाई गुप्तचर विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून होते. रविवारी (ता. 29) पहाटे सहार विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाचे उपायुक्त प्रज्ञाशील जुमले यांच्या पथकाने सापळा रचून दोन श्रीलंकन नागरिकांना ताब्यात घेतले.

आथील अब्दुल जब्बार आणि मोहंमद रमजान अशी त्यांची नावे आहेत. ते खासगी विमानाने कोलंबोला जाणार होते. त्यांची हवाई गुप्तचरच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. तेव्हा त्यांच्याकडे 21 लाख 23 हजार 100 रुपयांचे अमेरिकन डॉलर सापडले.

Web Title: foreign currency of 88 lac seized at mumbai airport

टॅग्स