व्हिडीओ पाहून घेता येणार घरबसल्या पर्यटनाचा अनुभव... 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : देशभरात संचारबंदी असून, पर्यटनस्थळे बंद आहेत. एप्रिल, मे या सुटीच्या महिन्यांत जंगल पर्यटनाला चांगला प्रतिसाद असतो. सध्या पर्यटन शक्‍य नसल्यामुळे नागरिकांना घरबसल्या जंगल सफारीचा अनुभव घेता यावा म्हणून वन विभागाने इन्स्टाग्राम, युट्यूब आदी माध्यमांतून व्हिडीओ व लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार ताडोबा व्याघ्र प्रकल्प, कोकण कासव महोत्सव आदींचे लाईव्ह प्रक्षेपण निसर्गप्रेमींना पाहता येईल. 

हे वाचलं का? : लाॅकडाऊनचे नियम न पाळल्यास पोलिसांकडून जबर कारवाई

व्हर्च्युअल ताडोबा दर्शन 
दक्षिण आफ्रिकेतील क्रूगर राष्ट्रीय उद्यानात लॉकडाऊनमुळे ऑनलाईन सफारी सुरू करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर आभासी जंगल पर्यटन सुरू करण्याचा निर्णय ताडोबा व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने घेतला आहे. https://mytadoba.org/ हे संकेतस्थळ आणि 'TATR 4K LIVE' https://www.youtube.com/channel/UCzj_lZkssvEhK3GykJ0A1sw या युट्यूब चॅनलवरून निसर्गप्रेमींना दररोज दुपारी 3 वाजता घरबसल्या जंगल पर्यटनाची अनुभूती घेता येईल. 

महत्त्वाचे : हुश्श! मुंबईवरचा मोठा धोका टळला, 11 हजार जणांचा होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण

वेळास ऑनलाईन 
कोकणातील कासव महोत्सव रद्द झाल्यामुळे मॅंग्रोव्ह फाऊंडेशनने समुद्रात जाणाऱ्या कासवांच्या पिलांना घरबसल्या ऑनलाईन पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी फाऊंडेशनच्या सोशल मिडिया हॅण्डलवरून दररोज सकाळी 6.30 आणि सायंकाळी 6 वाजता वेळासच्या किनाऱ्यावरून कासवमित्र मोहन उपाध्ये लाईव्ह प्रक्षपण करत आहेत. http://instagram.com/mangrove_foundation& आणि http://facebook.com/Mangrove.Foundation.Maharashtra& हे प्रक्षेपण पाहता येईल. 

बीएनएचएसची व्याख्याने 
घराच्या चार भिंतीत अडकलेले निसर्गप्रेमी आणि अभ्यासकांसाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) निसर्ग शिक्षण आणि संवर्धन केंद्राने पर्यावरण विषयक ऑनलाईन व्याख्यानांचे आयोजन केले आहे. आतापर्यंत झालेल्या दोन व्याख्यानांना चांगला प्रतिसाद मिळला. शनिवारी (ता. 18) नेहा सिन्हा पक्षी संवर्धनामधील आव्हाने आणि यश या विषयावर बोलतील. सोमवारी (ता. 20) गिरीश जठार भारतातील घुबडांच्या प्रजातींविषयी मार्गदर्शन करतील. बुधवारी (ता. 22) डॉ. राजू कसंबे फुलपाखरांचे अनोखे विश्‍व आपल्यासमोर उलगडतील. शुक्रवारी (ता. 24) मृगांक प्रभू बेडूक या उभयचराची ओळख करून देतील. पुढील रविवारी (ता. 26) डॉ. राजू कसंबे फुलपाखरू उद्यानाबाबत माहिती देतील. ही सर्व व्याख्याने सायंकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत https://instagram.com/bombaynaturalhistorysociety?igshid=u0c6vq3h9iil आणि https://www.facebook.com/groups/18423928338/ येथे ऐकायला आणि पाहायला मिळतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com