

Borivali National Park Crime News
ESakal
मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील त्रिमूर्ती परिसरात दोन अल्पवयीन मुलींची छेडछाड झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर वन विभागात कार्यरत असलेल्या दोन वनरक्षकांविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती मंजूर रजेवर मुंबईत आल्या होत्या. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.