मुंबई - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्या युतीबाबत योग्य वेळी बोलणार आहे, परंतु यंदाच्या निवडणुकीत मुंबई महापालिकेवर आपलीच सत्ता असेल हे लक्षात ठेवूनच मनसे कार्यकर्त्यांनी काम करावे, अशा सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या.