मुंबईकर व ग्रामस्थ पालटणार काकणेवाडी शाळेचे रूप

सनी सोनावळे
बुधवार, 27 जून 2018

टाकळी ढोकेश्वर - काकणेवाडी (ता.पारनेर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटलसह, संरक्षण भिंत व प्रवेशद्वार उभारण्याचा निर्णय येथील मुंबईकर व ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे या शाळेचे रूप निश्चित पालटणार आहे. गावातील ग्रामस्थ व मुंबईकर मित्र मंडळ यांनी पुढाकार घेत दरवर्षी विद्यार्थ्यांना दोन लाख रूपयांचे साहित्य वाटप करण्यात यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. यासंह शाळेतील परीसरात बोअरवेल घेऊन शाळेमधील विद्यार्थ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे.

आरोग्याच्या समस्या दूर होण्यासाठी जल शुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले. यावेळी भाजपाचे दक्षिण मुंबई जिल्हाउपाध्यक्ष सूर्यकांत पवार यांनी शाळेतील सर्व वर्ग नवकार ग्रुप मुंबई यांचे सहकार्याने 15 ऑगस्ट पर्यंत सर्व वर्ग डिजिटल करणार असल्याचे सांगितले. साने गुरुजी मित्र परिवार तर्फे शाळेला संरक्षण भिंत व प्रवेशद्वार उभारून देणार असल्याचे शिवाजी वाळुंज यांनी सांगितले. मुलांना प्रथमोपचार शाळेमध्ये मिळावा याकरिता दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील ॲड श्रीकांत वाळुंज यांनी सावली प्रतिष्ठान मार्फत शाळेला प्रथमोपचार पेटी दिली.

मारूती वाळुंज व पोपट वाळुंज यांनी शाळेभोवती वृक्षारोपण व सुशोभीकरण स्वखर्चाने करणार आहेत. यावेळी उपसरपंच निवृत्ती वाळुंज, जयवंत वाळुंज, सूर्यकांत पवार, शिवाजी वाळुंज, गटशिक्षणाधिकारी संभाजी झावरे, भगवान वाळुंज, राजेंद्र झावरे उपस्थित होते.

Web Title: The form of Kaknewadi school will be shifted to Mumbaikar and the villagers