esakal | आजोबांनी नातवाला फटकारल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणतात, तो त्यांच्या...
sakal

बोलून बातमी शोधा

आजोबांनी नातवाला फटकारल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणतात, तो त्यांच्या...

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी हा पवार यांचा कौटुंबिक विषय असल्याचं म्हटलं आहे. 

आजोबांनी नातवाला फटकारल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणतात, तो त्यांच्या...

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार यांना जाहिररित्या फटकारले. पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर शरद पवार यांनी भाष्य करत माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा अस्थवस्थता निर्माण झाल्याचं चित्र आहे. यावर आता वेगवेगळ्या राजकारणांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्यात. राजकीय वर्तुळात यावरुन चांगलीच चर्चा रंगली आहे. यावर आता  माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी हा पवार यांचा कौटुंबिक विषय असल्याचं म्हटलं आहे. 

आजोबा आणि नातवातला जो काही वाद, विवाद, संवाद आहे. त्यात आम्ही का बोलायचं? तो त्यांच्या घरचा प्रश्न आहे, असं फडणवीस म्हणाले. तसंच  'आजोबांनी नातवाला किंमत द्यायची की नाही हे आजोबांनी ठरवायचं आहे आणि नातवानं आजोबांना आवडेल असं वागायचं की नाही हे नातवानं ठरवायचं आहे. त्या संदर्भात मी अधिक बोलणं योग्य नाही,' असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हेही वाचाः पार्थ पवार यांना फटकारल्यानंतर काय होती राणे बंधुंची प्रतिक्रिया, जाणून घ्या

दरम्यान, सुशांतसिंहच्या प्रकरणात सीबीआय चौकशी करायची असेल तर माझी हरकत नाही हे स्पष्ट करत पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे एवढं मात्र खरं, हे सुद्धा सांगायला फडणवीस विसरले नाहीत. 

शरद पवार काय म्हणाले 

पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी CBI द्वारे करण्याची मागणी केली होती. पार्थ यांनी केलेल्या या मागणीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी म्हटलं की,  माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचं, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलिस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचं कारण नाही.

अधिक वाचाः आजोबांनी पार्थ पवारांना फटकारलं, काकांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

सुशांत प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे देण्याची कोणतीही गरज नाही. मुंबई पोलिसांना मी गेल्या ५० वर्षांपासून ओळखतो. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. सुशांतसिंग प्रकरणाची चर्चा करण्याचे कारण नाही. त्यामुळं कुणी काय आरोप केले यात मी खोलात जाणार नाही. माझ्या दृष्टीनं हा विषय तितका महत्वाचा नाही. एखाद्याने आत्महत्या केली तर नक्कीच दु:ख होते. मात्र त्याची चर्चा ज्या पद्धतीने होत आहे. त्याचे मला आश्चर्य वाटते, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती.

formar cm devendra fadnavis react on Ncp Sharad Pawar calls parth pawar Immature