माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांचे पुत्र नाविद अंतुले यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 29 April 2020

  • नविद अंतुले यांचे हद्दयविकाराच्या झटक्याने निधन
  • रायगड जिल्ह्यावर शोककळा 

नवी मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे पुत्र नाविद अंतुले यांचे आज(ता.28) हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन निधन झाले. मुंबईतील सैफी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा

अंतुलेंच्या निधनानंतर राजकारणाकडे पाठ फिरवलेल्या नाविद यांनी गेल्यावर्षी लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेत प्रवेश करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. शिवसेनेत नाविद यांनी प्रवेश करून ए. आर. अंतुले यांचे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत असणारे नाते अधिक वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला. नाविद यांच्या शिवसेना प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यातील आंबेत वाशीयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. शिवसेनेत आल्यावर अंतुले यांनी खासदार सुनिल तटकरेंविरोधात प्रचार केला. आपल्या वडिलांना त्यांच्या कारकिर्दीत न पूर्ण करता आलेली स्वप्न पूर्ण करण्याचे नाविद यांनी स्वप्न उराशी बाळगले होते. परंतु आज रात्री हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Chief Minister A.R Antule's son Naveed Antule passed away