
काँग्रेसच्या डोंबिवलीमधील माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. कल्याणमधील माजी आमदारांनी काँग्रेसची परिस्थिती गंभीर करून ठेवली आहे, असा थेट आरोप त्यांनी पक्षातील वरिष्ठांवर केला आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डोंबिवली काँग्रेसमधील माजी नगरसेवकांनी गुरुवारी भाजपात प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला डोंबिवलीमध्ये मोठे खिंडार पडले आहे.