

Morbe Dam Illegal Farmhouse
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणाच्या बुडीत क्षेत्रात अनधिकृत फार्म हाऊसची उभारणी केली जात असल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हा फार्म हाऊस माजी मंत्र्याचा असल्याची चर्चा होत आहेत. एकीकडे महापालिकेकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जात असताना, दुसरीकडे माजी मंत्र्याकडून होत असलेले या अनधिकृत बांधकामामुळे चर्चांना उधाण आले आहे.