esakal | भाजपाला झटका? मुंबईतील एका माजी आमदाराची शिवसेनेत घरवापसीची तयारी
sakal

बोलून बातमी शोधा

BJP and Shivsena

भाजपाला झटका? मुंबईतील एका माजी आमदाराची शिवसेनेत घरवापसीची तयारी

sakal_logo
By
सुमीत सावंत, मुंबई

मुंबई: पुढच्यावर्षाच्या सुरुवातीला मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (bmc election) होणार आहे. शिवसेनेला (shivsena) महापालिकेत सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. दोन्ही बाजुंकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप सुरु असताना, या निवडणुकीआधी भाजपाला (bjp) एक झटका बसण्याची शक्यता आहे. सध्या भाजपामध्ये असलेले माजी आमदार सुरेश गंभीर (Suresh gambhir) पुन्हा एकदा हाती शिवबंधन बांधण्याची दाट शक्यता आहे. २०१६ साली सुरेश गंभीर यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता.

आज सुरेश गंभीर यांनी माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृती दिनी शिवतीर्थावर येऊन अभिवादन केले व त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सुरेश गंभीर यांनी तीनवेळा शिवसेनेच्या तिकिटावर आमदारकीची निवडणूक जिंकली आहे. १९९५, १९९९ आणि २००४ असे सलग तीन वेळा ते आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा भाग प्रभादेवी आणि दादर मिळून माहिम मतदारसंघ तयार झाला. त्यानंतर सुरेश गंभीर यांना शिवसेनेत फारशी संधी मिळत नव्हती.

हेही वाचा: खरमाटेंचे 750 कोटींचे साम्राज्य पाहणीसाठी सोमय्या सांगलीत

अखेर २०१६ साली त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. सुरेश गंभीर यांच्यासह शामल सुरेश गंभीर आणि शीतल सुरेश गंभीर या त्यांच्या दोन्ही मुलींनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. शीतल गंभीर या भाजप वार्ड क्रमांक १८२ च्या भाजप नगरसेविका आहेत, तर शामल यांचा भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवताना पराभव झाला होता.

हेही वाचा: Karuna Sharma: करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी

उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे सुरेश गंभीर आणि त्यांच्या दोन्ही कन्याची घरवापसी होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सुरेश गंभीर दादर माहीम मतदार संघातून शिवसेनेचे ३ वेळा आमदार राहिले आहेत. सुरेश गंभीर हे जुन्या फळीतील शिवसैनिक आहेत.

loading image
go to top