धक्कादायक ! कौटूंबिक वादातून माजी शाखाप्रमुखाची मुलाकडून हत्या

शरद भसाळे
Sunday, 27 September 2020

नारपोली पोलिसांनी हत्येच्या घटनेनंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयात पाठवला.

भिवंडी : शहरातील कामतघर येथील शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील (68) यांची कौटुंबीक वादातून मुलानेच मटण कापण्याच्या सुऱ्याने सपासप वार करून हत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपी मुलास अटक केली आहे. ब्रिजेश पाटील असे नारपोली पोलिसांनी अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. 

नक्की वाचा : शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी राज्यपालांना निवेदन; आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार

कामतघर येथे राहणारे गुरुनाथ पाटील हे आपल्या घरात दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास झोपले असताना मुलगा ब्रिजेश याने कौटुंबीक वादाच्या रागातून मटण कापण्याच्या सुऱ्याने वडिलांच्या मानेवर, तोंडावर वार केले. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. मृत गुरुनाथ यांचे त्यांच्या मुलांसोबत मागील वर्षभरापासून कौटुंबिक वाद होते. त्याबाबत पाटील यांनी नारपोली पोलिसांकडे तक्रारही केली होती. याबाबत अदखलपात्र गुन्हे नोंद झाले होते. 

हे ही वाचा : हवाई दलाच्या तळाजवळ इमारतींना परवानगी कशी? भाजपचा ठाणे पालिकेला सवाल 

दरम्यान, नारपोली पोलिसांनी हत्येच्या घटनेनंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी मुलगा ब्रिजेश यास ताब्यात घेत त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे करीत आहेत.

(संपादन : वैभव गाटे)

former shiv sena branch head death in bhiwandi read full story

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former shiv sena branch head death in bhiwandi read full story