हजारो मशालींनी उजळून निघाला किल्ले प्रतापगड! भवानी मातेच्या मंदिराला 360 वर्षे पूर्ण

देवेंद्र दरेकर
Wednesday, 21 October 2020

छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेला किल्ले प्रतापगड मशालींनी उजळून निघाला आहे. प्रतापगडावर असलेल्या मातेच्या मंदिराला 360 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मशाल महोत्सव पोलादपूर येथील नागरिकांनी आयोजित केला.

पोलादपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेला किल्ले प्रतापगड मशालींनी उजळून निघाला आहे. प्रतापगडावर असलेल्या मातेच्या मंदिराला 360 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मशाल महोत्सव पोलादपूर येथील नागरिकांनी आयोजित केला.

सगळ्यांसाठी लोकल ट्रेन कधी सुरू होणार? मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले उत्तर

नवरात्रोत्सवात चतुर्थीला राज्यभरातून हजारो शिवभक्त प्रतापगडावर हजेरी लावून या मशाल महोत्सवाचा आनंद घेत असत. परंतु, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मशाल महोत्सव साजरा करायचा की नाही? असा प्रश्न त्यांना पडला होता. तरी काही मोजक्‍याच शिवभक्तांच्या उपस्थितीत मशाल महोत्सव कोरोनाची भीती न बाळगता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून धुक्‍याच्या काळोखात पार पडला. 
उपस्थित शिवभक्तांनी सरकारच्या सर्व नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा केला. आपल्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशावर उद्‌भवलेले कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी; तसेच पुढच्या वर्षी हा मशाल महोत्सव उत्तम प्रकारे पार पडण्यासाठी भवानी मातेच्या चरणी प्रार्थना केली. 

खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजपला पडणार खिंडार? जयंत पाटीलांनी केला गौप्यस्फोट

शिवकाळ अवतरला 
भवानीमातेची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर "जय भवानी, जय शिवाजी', "छत्रपती शिवाजी महाराज की जय'चा जयघोष करून मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. त्यानंतर तुतारीचा नाद करत गड दणाणून निघाला. प्रतापगड किल्ल्याच्या चहुबाजूंनी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भवानी माता मंदिरापासून बुरुजापर्यंत लावण्यात आलेल्या मशालांमुळे गड उजळून निघाला. या नयनरम्य नजाऱ्यामुळे जणू शिवकाळच अवतरला असल्याचा भास होत होता. 

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fort Pratapgad lit by thousands of torches Bhavani completes 360 years of motherhood