
मुंबई : पारंपरिक साहित्य वापरून तब्बल ८०० किलो वजनाच्या मोदकाच्या लोकार्पणाचा सोहळा मुंबईतील प्रसिद्ध ‘गिरगावचा राजा’ मंडपात झाला. फॉर्च्युन फूड्सने हा मोदक बनवला आहे. वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाने ‘पारंपरिक साहित्यापासून बनवलेला सर्वात मोठा मोदक’ या मोदकाची नोंद केली आहे.